Summer Travel Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Travel Tips: उन्हाळ्यात प्रवास करताना ट्रॅव्हल किटमध्ये 'या' वस्तू नक्की ठेवा

Travel Tips: तुम्हीही उन्हाळ्यात ट्रिप प्लॅन करत असाल तर ट्रॅव्हल किटमध्ये पुढील महत्वाच्या गोष्टी ठेवण्यास विसरू नका.

Puja Bonkile

summer travel tips keep these things in travel kit read list

अनेक लोक लोक विश्रांती आणि आनंदासाठी तर काही नवीन गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी ट्रिप प्लॅन करतात. प्रत्येकाला प्रवास करायला आवडतो. प्रत्येकाला समुद्रकिनारे, रिसॉर्ट्स, राष्ट्रीय उद्याने, ऐतिहासिक वास्तू पाहायला आवडतात.

ही अशी वेळ आहे जेव्हा आपण सर्व काही विसरून नवीन ठिकाणे, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीचा आनंद घेत असतो. अनेकजण उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करतात तेव्हा बॅगेत खाद्यपदार्थ औषधे, कपडे आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी सोबत ठेवतात. पण तुम्हीही बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या बॅगेत पुढील गोष्टी असणे गरजेचे आहे.

पाणी बॉटल

उन्हाळ्यात बाहेर प्रवास करताना पाणी सोबत असणे गरजेचे आहे. कारण उन्हामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे तुम्हाला प्रवासाचा आनंद घेता येणार नाही. यासाठी बॅगमध्ये पाणी बॉटल किंवा ज्युस सोबत ठेवावे.

सनस्क्रीन

उन्हाळ्यात बाहेर प्रवास करताना सनस्क्रीनसोबत ठेवणे गरजेचे आहे. कारण सुर्याच्या अतिनिल किरणांपासून त्वचेवर टॅन येऊ शकतो. सनस्क्रीन लावल्याने त्वचेवर टॅन होणार नाही.

फुटवेअर

बाहेर फिरायला जाताना योग्य आणि आरामदायी चप्पल किंवा बुट सोबत ठेवावा. यामुळे पाय दुखणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात त्यानुसार फुटवेअर घालावे.

सैल आणि लाइट कलरचे कपडे

उन्हाळ्यात सैल आणि लाइट कलरचे कपडे घालणे योग्य असते. उन्हाळ्यात डार्क कलरचे कपडे घालणे टाळावे. तसेच उन्हाळ्यात चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. उन्हाळ्यात नेहमी पांढऱ्या किंवा लाइट कलरचे कपडे घालावे.

सनग्लास

उन्हाळ्यात प्रवास करताना सनग्लास सोबत ठेवावा. यामुळे डोळ्याचं सुर्याच्या तीव्र किरणांपासून बचाव होतो.

हॅट किंवा स्कार्फ

सुर्याच्या तीव्र किरणांपासून बचाव करण्यासाठी हॅट किंवा स्कार्फचा वापर करावा. यामुळे केस थेट सुर्याच्या संपर्कात येणार नाही. मार्केटमध्ये विविध प्रकारचे हॅट आणि स्कार्फ मिळतात.

हॅड ग्लोज

उन्हाळ्यात प्रवास करताना तुमच्या बॅगमध्ये हॅड ग्लोज असलेच पाहिजे. हॅड ग्लोज घातल्यामुळे सुर्याच्या तीव्र किरणांपासून हाताचे रक्षण होते. उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे हॅड ग्लोज वापरणे चांगले असते.

औषधे

उन्हाळ्यात प्रवास करतांना औषधे नक्की सोबत ठेवावे. कारण अनेक लोकांना मळमळ, उलट्या यासारख्या समस्यांचा त्रास होतो. यामुळे प्रवासाचा आनंद खराब होऊ नये यासाठी आवश्यक ते औषधे सोबत ठेवावी.

त्यामुळे तुम्हीही येत्या उन्हाळ्यात कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या ट्रॅव्हल किटमध्ये या आवश्यक गोष्टी नक्की ठेवा आणि तुमच्या आरामदायी सुट्टीचा आनंद घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

SCROLL FOR NEXT