उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात राहणे हृदयरोगींसाठी धोकादायक ठरु शकते. ज्याप्रमाणे हृदयरोगींना हिवाळ्यात त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यातही तीच गरज असते. यामध्ये थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला रुग्णालयात दाखल करु शकते. हिवाळ्यात धमन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर समस्यांचा धोका असतो. उन्हाळ्यात हृदयाच्या धमन्यांवरही परिणाम होतो. चला तर मग उन्हाळ्यात हृदयाची कशी काळजी घ्यायची याबाबत जाणून घेऊया...
दरम्यान, ज्या लोकांना हृदयरोग (Heart Disease) आहे त्यांनी उन्हाळ्यात काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ज्यांना आधीच हृदयरोग आहे त्यांनी उन्हाळ्यात त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी हृदयाला जास्त काम करावे लागते. हृदयाचे जास्त काम तुम्हाला रुग्णालयात दाखल करु शकते. म्हणून, उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्याचा प्रयत्न करा.
राजीव गांधी रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. अजित जैन सांगतात, उन्हाळ्यात (Summer) जास्त वेळ उन्हात राहिल्यास शरीर गरम होते. शरीर थंड ठेवण्यासाठी हृदयाला जास्तीत-जास्त पंपिंग करावे लागते. शरीराच्या प्रत्येक भागाला रक्तपुरवठा करावा लागतो. यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. यासाठी हृदयाला जास्त काम करावे लागते. याशिवाय, हृदयरोगाने पीडिताला उष्माघात, डिहाइड्रेशन, अँजायना आणि हृदयविकाराचा धोका जास्त असतो. म्हणून जास्त व्यायाम टाळून स्वतःला थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा.
उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवून तुम्ही तुमचे हृदय आरोग्य राखू शकता. यासाठी उन्हात बाहेर जाणे टाळावे. जास्त वेळ उन्हात राहू नये. स्वतःला हायड्रेटेड ठेवावे. संतुलित आहार घेण्यासोबत मद्यपान आणि धूम्रपान टाळावे. हलके कपडे घालावेत. दिवसातून दोनदा आंघोळ करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. याशिवाय, तणावापासून दूर राहण्यासोबत जंक फूड आणि मसालेदार खाद्यपदार्थांचे सेवन टाळावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.