मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

Rohit Sharma Shivaji Park practice: टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम टप्प्यावर पोहचल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांचे सर्व लक्ष आयपीएल (IPL 2026) कडे लागले आहे.
Rohit Sharma Shivaji Park practice
Rohit Sharma Shivaji Park practiceDainik Gomantak
Published on
Updated on

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम टप्प्यावर पोहचल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांचे सर्व लक्ष आयपीएल (IPL 2026) कडे लागले आहे. जागतिक स्तरावरील या मोठ्या स्पर्धेनंतर आता भारतीय क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच आयपीएलचा थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि 'हिटमॅन' रोहित शर्माने आतापासूनच कंबर कसली आहे. मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देण्याच्या निर्धाराने रोहित मैदानात उतरला असून त्याची मेहनत पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मैदानात घाम गाळतोय 'हिटमॅन'

रोहित शर्माने आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर त्याला नेट प्रॅक्टिस करताना पाहून चाहत्यांच्या नजरा सुखावल्या आहेत. रोहित केवळ स्वतः सराव करत नाहीये, तर तिथल्या युवा खेळाडूंना आणि गोलंदाजांनाही आपल्या अनुभवाचा फायदा मिळवून देत आहे. त्याच्या या सराव सत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, 'हिटमॅन' आता खऱ्या अर्थाने मैदानात परतीच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहे.

Rohit Sharma Shivaji Park practice
Goa Budget: गोवा राज्यावर कर्जाचा बोजा वाढला, दरडोई उत्पन्नातही भर; 'आर्थिक सर्वेक्षण अहवाल' वाचा एका क्लिकवर

'सुपरफिट' रोहितचा नवा प्लॅन

गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये रोहित अनेकदा फक्त फलंदाजी करताना दिसला होता, तर क्षेत्ररक्षणादरम्यान त्याने विश्रांती घेतली होती. मात्र, यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. रोहित आता पूर्वीपेक्षा अधिक सडपातळ आणि 'सुपरफिट' दिसत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित यावर्षी 'इम्पॅक्ट प्लेयर'च्या भूमिकेत राहण्याऐवजी मैदानात पूर्ण २० षटके क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज आहे. आपल्या फिटनेसवर त्याने केलेल्या विशेष मेहनतीचा फायदा निश्चितच मुंबई इंडियन्सला या हंगामात होऊ शकतो.

Rohit Sharma Shivaji Park practice
Goa Dangerous Spot: गोव्यातील 'हे' ठिकाण ठरते आहे 'धोकादायक', आतापर्यंत चौघांचा बळी; बंदी घालायची होते आहे मागणी

मुंबई इंडियन्सच्या विजयाचा ध्यास

मार्च महिन्याच्या अखेरीस आयपीएल २०२६ चा बिगुल वाजणार आहे. मागील काही हंगामात मुंबई इंडियन्सच्या प्रदर्शनात चढ-उतार पाहायला मिळाले असले तरी, रोहित शर्माचे हे 'डेडिकेशन' चाहत्यांसाठी एक मोठी आशा आहे.

रोहितची बॅट जर या हंगामात तळपली, तर मुंबई इंडियन्ससाठी पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न साकार करणे कठीण नाही. मुंबईचा हा 'राजपुत्र' पुन्हा एकदा मैदानावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com