Physical and Mental Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Blood Sugar Levels: योग्य आहार आणि नियमित दिनचर्या केवळ तुमचा मूड (Mood) सुधारत नाहीतर शारीरिक आणि मानसिक आरोग्यही (Physical and Mental Health) संतुलित ठेवते.

Manish Jadhav

जर तुम्हालाही अनेकदा कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय राग (Anger) येत असेल, तर ही केवळ एक वर्तणूक समस्या (Behavioral Problem) नसून, तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेच्या पातळीतील (Blood Sugar Level) चढ-उतारांचे (Fluctuations) संकेत असू शकतात.

अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या आहाराकडे (Diet) आणि जीवनशैलीकडे (Lifestyle) लक्ष देणे गरजेचे ठरते. याबाबतीत गरज वाटल्यास तुम्ही डॉक्टर किंवा पोषण तज्ञांचा (Nutrition Expert) सल्ला घेऊ शकता. योग्य आहार आणि नियमित दिनचर्या केवळ तुमचा मूड (Mood) सुधारत नाहीतर शारीरिक आणि मानसिक आरोग्यही (Physical and Mental Health) संतुलित ठेवते.

रक्तातील साखर आणि मूडचा संबंध

रक्तातील साखर म्हणजेच शरीरातील ग्लुकोजची पातळी (Glucose Level), मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यास आणि मूड संतुलित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा रक्तातील साखर सामान्य असते, तेव्हा मेंदूला सतत ऊर्जा मिळत राहते, ज्यामुळे व्यक्तीचा मूड संतुलित राहतो. परंतु, जेव्हा साखरेची पातळी अचानक कमी होते याला 'हायपोग्लायसेमिया' (Hypoglycemia) म्हणतात. तेव्हा मेंदूला आवश्यक ऊर्जा मिळत नाही, ज्यामुळे राग, चिडचिडेपणा, चिंता किंवा गोंधळाची स्थिती देखील निर्माण होऊ शकते.

कमी रक्तातील साखर रागाचे कारण का बनते?

जेव्हा शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक कमी होते, तेव्हा ते एक धोक्याच्या इशाऱ्यासारखे काम करते. शरीर तणावाच्या (Stress) स्थितीत जाते आणि 'फाइट-ऑर-फ्लाइट' (Fight-or-Flight) मोड सक्रिय होतो. या स्थितीत शरीर ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसोल (Cortisol) यांसारखे तणाव हार्मोन (Stress Hormones) सोडते, ज्यामुळे हृदयाची धडधड वाढते, अस्वस्थता (Restlessness) आणि राग वाढतो. म्हणूनच अनेक लोक भुकेले असताना रागावतात, ज्याला आजकाल 'हँग्रा' (Hangry - Hungry + Angry) असेही म्हटले जाते.

जास्त रक्तातील साखरही रागास कारणीभूत

केवळ कमी रक्तातील साखरच नाही, तर खूप जास्त रक्तातील साखर हायपरग्लायसेमिया (Hyperglycemia) देखील मूडवर परिणाम करते. जेव्हा शरीर जास्त काळ उच्च साखरेच्या संपर्कात राहते, तेव्हा ते मेंदूच्या न्यूरोकेमिस्ट्रीवर (Neurochemistry) परिणाम करु शकते. यामुळे थकवा (Fatigue), लक्ष केंद्रीत करण्यात अडचण (Lack of Focus) आणि चिडचिडेपणा जाणवू शकतो.

कोणाला जास्त धोका?

मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetic Patients) रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार जास्त प्रमाणात होतात, त्यामुळे त्यांच्या मूडमध्ये अचानक बदल होणे सामान्य असू शकते.

याशिवाय, जे लोक अनियमित आहार (Irregular Eating) घेतात, खूप वेळ उपाशी राहतात किंवा जास्त गोड खातात त्यांनाही ही समस्या उद्भवू शकते.

रक्तातील साखर आणि मूड नियंत्रणात कसे ठेवाल?

आपल्या रक्तातील साखर आणि मूड नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करु शकता.

  • संतुलित आहार: दिवसभरात लहान-लहान अंतरावर संतुलित भोजन करा.

  • पौष्टिक घटक: आपल्या आहारात प्रोटीन, फायबर (Fiber) आणि हेल्दी फॅट्सचा (Healthy Fats) समावेश करा.

  • प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा: जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ (Processed Food) आणि साखर (Sugar) खाणे टाळा.

  • नियमित व्यायाम: नियमित व्यायाम करा, जेणेकरुन शरीरातील इन्सुलिन (Insulin) चांगल्या प्रकारे काम करेल.

  • पुरेशी झोप आणि ताणतणाव व्यवस्थापन: पुरेशी झोप घ्या आणि तणाव व्यवस्थापनावर (Stress Management) लक्ष केंद्रित करा.

दरम्यान, या सवयी अवलंबल्यास तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी आणि त्यामुळे होणारे मूड स्विंग्स प्रभावीपणे नियंत्रित करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'भारताने गोव्याची केलेली मुक्तता उच्चवर्णीय हिंदू राज्याने ख्रिश्चनांविरुद्ध केलेले युद्ध होते'; लेखिका अरुंधती रॉय

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

दया भाभी परतली! जेठालालच्या Nano Images सोशल मीडियावर Viral; दया-बबितामध्ये कोणाला निवडणार?

Team India New Jersey Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा 'जर्सी स्पॉन्सर', प्रत्येक सामन्यासाठी BCCIला देणार 4.5 कोटी

Samsung Galaxy S25 FE: 50MP ट्रिपल कॅमेरा, 4900mAh बॅटरी... बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स! सॅमसंगचा नवा फोन लाँच, किंमत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT