Success Mantra Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Success Mantra: आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना 'या' 4 गोष्टी लक्षात ठेवा, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश

Success Mantra: आयुष्यात योग्य निर्णय घेणे खूप महत्वाचे आहे. योग्य निर्णय घेणे सोपे काम नाही आणि त्यात अनेक अडचणी येतात. आयुष्यात योग्य निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Success Mantra how to take important decision in life

आयुष्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी आपल्याला अनेकदा महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. योग्य निर्णय घेणे सोपे काम नाही. अनेक वेळा आपल्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे आपले निर्णय चुकू शकतात. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

भावनेच्या आहारी निर्णय घेऊ नका

कोणताही निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण ठेवावे. लोक सहसा त्यांच्या भावनांमुळे योग्य ते चुकीची निवड करू शकत नाहीत. भावनेने घेतलेले निर्णय भविष्यात अनेकदा चुकीचे ठरतात. त्यामुळे आयुष्यातील निर्णय घेताना भावनांसोबत मनाचेही ऐकावे. तुमचे फायदे आणि तोटे लक्षात घेऊनच कोणताही निर्णय घ्यावा.तरच तुम्हाला यश मिळू शकते.

प्लॅन Bतयार ठेवावा

योग्य निर्णय घेताना अनेक धोके असतात. तुमचा प्रत्येक निर्णय योग्यच असेल असे नाही. जर तुम्हाला कोणताही निर्णय योग्य वाटला नाही तर तुम्हाला तो स्वीकारावा लागेल. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयासाठी बॅकअप प्लॅन तयार ठेवावा. निर्णय घेताना, निर्णय चुकला तर त्यानंतर काय करता येईल याचा विचार करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या निर्णयाच्या परिणामासाठी मानसिकदृष्ट्या तयार व्हाल.

ज्येष्ठांचा सल्ला घ्या

जेव्हा अडचणी येतात तेव्हा लोक सहसा घाबरतात आणि पुढे काय करावे हे त्यांना समजत नाही. अशा वेळी आपल्या ज्येष्ठांचे अनुभव आपल्याला उपयोगी पडू शकतात. तुम्ही तुमच्या मनातील भावना त्यांच्याशी शेअर करू शकता आणि त्यांचा सल्ला घेऊ शकता.

यामुळे तुम्हाला कोणताही मोठा निर्णय घेणे सोपे जाईल. आपण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मित्रांचा सल्ला देखील घेऊ शकता. यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही.

निर्णयाच्या परिणामांचा विचार करावा

कोणताही निर्णय घेताना त्याच्या परिणामांचा नीट विचार करा. त्या निर्णयाचा तुम्हाला लगेच फायदा होणार आहे की नंतर फायदा होणार आहे यावर लक्ष केंद्रित करा. काही निर्णय असे असतात जे काही काळ वेदना देतात पण नंतर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. हे निर्णय आपल्या कारकिर्दीशी किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly Live: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात; युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप!

Report: पाकिस्तानात 8700 दहशतवादी सक्रिय! संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा, भारतासाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT