Special Ayurvedic tips for quick recovery from covid Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Covid Care Tips: कोविडपासून लवकर बरं होण्यासाठी खास आयुर्वेदिक टिप्स

भरपूर प्रमाणात आयुर्वेदिक उपायांची (Ayurvedic remedies) उपलब्धता आहे, याच्या उपयोगाने शरीर आणि मनाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

दैनिक गोमन्तक

संपूर्ण जग कोविड -19 (Covid 19) च्या संक्रणापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतानाच, या संसर्गातून बरे झालेले लोक मोठ्या संख्येने अजूनही आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. आणि या अवस्थेला 'लाँग कोविड' (long Covid) असे म्हटले जाते. तज्ञांच्या म्हणण्या नुसार कोविड पेक्षा जास्त त्रास हा या अवस्थेत होत असतो.

“जागतिक आरोग्य संघटनेने दीर्घ कोविड ग्रस्त लोकांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतातील अभ्यासात असे आढळून आले आहे की, साथीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लाँग कोविडच्या प्रकरणांमध्ये चार पटीने वाढ झाली आहे. दीर्घकालीन परिणाम जसे थकवा, श्वास लागणे, सतत खोकला, छातीत दुखणे, पाचन-तंत्राशी संबंधित आजार, स्मरणशक्ती आणि एकाग्रतेमध्ये समस्या अश्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान लोक या समस्येचा सामना करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करत आहेत.भरपूर प्रमाणात आयुर्वेदिक उपायांची (Effective ayurvedic tips) उपलब्धता आहे, याच्या उपयोगाने शरीर आणि मनाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. "आधुनिक आयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार, विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर प्रतिकारशक्ती पातळी राखणे महत्वाचे आहे. जेणेकरून पुन्हा संसर्ग होण्यापासून बचाव केला जाईल यासाठी अनेक उपायांचा अवलंब करता येईल.

Special Ayurvedic tips for quick recovery from covid 19

नकारात्मक चाचणीनंतर रुग्णाला विश्रांतीची गरज असते आणि हेच कोविड -19 नंतरच्या उपचारांची सुरूवात आहे. याशिवाय या कालावधीत रुग्ण कोमट पाण्याचे सेवन करून चांगले हायड्रेटेड राखणे महत्वाचे आहे. तसेच त्यांच्या आहारपद्धतीत पुरेशी खनिजे आणि जीवनसत्त्वे जसे की जस्त, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि बी जीवनसत्त्वे, शिजवलेला ताजा आहार यांचा उपयोग केला जातो.

याव्यतिरक्त पालेभाज्या, सूप, तांदूळ, गहू किंवा आले, लसूण, मिरपूड, हळद, टोमॅटो इत्यादी पचायला सोपा पदार्थ समाविष्ट केलेले असतात. प्राणायाम आणि योग आसन दैनंदिन दिनक्रमात समाविष्ट करावे. प्राणायाम फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. “सर्व बरे झालेल्या रूग्णांनी त्यांच्या ऑक्सिजनच्या पातळीवर लक्ष ठेवणे गरजेचे असते.

आले: एक दाहक मसाला, हे शरीराला डिटॉक्सिफाई करण्यासाठी आणि फुफ्फुसातील प्रदूषकांपासून मुक्त होण्यास मदत करते. हे रक्ताभिसरण सुधारण्यास देखील मदत करते "आयुर्वेदानुसार, दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी कच्चे आले खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होऊ शकतो"

काळी मिरी: काळी मिरी हे अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे आणि वैज्ञानिक संशोधनानुसार कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसाचे विकार यासारख्या आजारांना दूर करते. श्वसनाचे आजार बरे करण्यासाठी हा एक uउत्तम पर्याय आहे.

वेलची: हिरवी वेलची, जी स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, एक नैसर्गिक कफ पाडणारे औषध आहे, जे फुफ्फुसांना अतिरिक्त कफपासून मुक्त करण्यास मदत करते फुफ्फुसाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे.

भारतीय लांब मिरची: भारतीय लांब मिरची ही एक औषधी वनस्पती आहे, त्याची फळे आणि मुळे हर्बल औषधे तयार करण्यासाठी वापरली जातात दमासाठी अत्यंत औषधी समजली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT