Soft Drinks  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Soft Drinks: सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याने 22 लाख लोक ठरले मधुमेहाचे शिकार; रिपोर्टमधून मोठा खुलासा

Soft Drinks And Diabetes Risk: नेचर मेडिसिनने एक रिसर्च प्रकाशित केला. ज्यामध्ये सांगण्यात आले की, 2020 मध्ये हाय लेवल सॉफ्ट ड्रिंक्स पिण्यामुळे जगभरात टाइप 2 मधुमेहाचे अंदाजे 2.2 दशलक्ष रुग्ण आढळले.

Manish Jadhav

Soft Drinks And Diabetes Risk: आपण अनेकदा जेवाणासोबत सॉफ्ट ड्रिंक्स घेतो. काही लोकांना तर सॉफ्ट ड्रिंक्स पिणे आवडते. ते एका दिवसात अनेक बॉटल्स सॉफ्ट ड्रिंक्स पितात, परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही नकळत पित असलेल्या सॉफ्ट ड्रिंक्सचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? या बातमीत, आम्ही तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक्स तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे सांगणार नाही, तर आम्ही तुमच्यासमोर एक रिसर्च ठेवणार आहोत, ज्यामध्ये आतापर्यंत हाय लेवल सॉफ्ट ड्रिंक्स पिण्यामुळे आरोग्यावर काय परिणाम झाला ते सांगितले आहे.

रिसर्चमधून काय समोर आले?

अलीकडेच, नेचर मेडिसिनने एक रिसर्च प्रकाशित केला. ज्यामध्ये सांगण्यात आले की, 2020 मध्ये हाय लेवल सॉफ्ट ड्रिंक्स पिण्यामुळे जगभरात टाइप 2 मधुमेहाचे अंदाजे 2.2 दशलक्ष रुग्ण आढळले. या रिसर्चमध्ये नेचर मेडिसिनने 184 देशांचे सर्वेक्षण केले. सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याने जागतिक स्तरावर किती लोक मधुमेह (Diabetes) आणि हृदयरोगांना बळी पडतात हे रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे. टाइप 2 मधुमेहाच्या प्रकरणांव्यतिरिक्त, संशोधकांनी असा अंदाज लावला की, सॉफ्ट ड्रिंक्स पिण्यामुळे हृदयरोगाचे 1.2 दशलक्ष रुग्ण आढळून आले.

या रिसर्चमधून असे समोर आले की, जागतिक स्तरावर पुरुष महिलांपेक्षा जास्त सॉफ्ट ड्रिंक्स पितात. यासोबतच तरुणाई सुद्धा सॉफ्ट ड्रिंक्स सेवनचे मोठ्याप्रमाणावर करते. रिसर्चनुसार, जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये सॉफ्ट ड्रिंक्समुळे होणाऱ्या आजारांची पातळी वेगवेगळी आहे. रिसर्चमध्ये पुढे म्हटले की, लॅटिन अमेरिका, कॅरिबियन आणि उप-सहारा आफ्रिका हे असे देश आहेत, जिथे जास्त प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स पिण्यामुळे लोक आजारी पडत आहेत.

सर्वाधिक प्रकरणांची नोंद कुठे झाली?

रिसर्चनुसार, सब-सहारा आफ्रिकेतील 21 टक्के लोक सॉफ्ट ड्रिंक्सच्या सेवनामुळे मधुमेहाचे शिकार ठरले. लॅटिन अमेरिका (America) आणि कॅरिबियनमध्ये 24 टक्के मधुमेह आणि 11 टक्के हृदयरोगाची प्रकरणे नोंदवली जातात. रिसर्चमधून असे दिसून आले की, 2020 मध्ये कोलंबियामध्ये 50 टक्के मधुमेहाचे रुग्ण शुगरयुक्त सॉफ्ट ड्रिंक पिण्यामुळे झाले होते. अमेरिकेतही सॉफ्ट ड्रिंक्सच्या सेवनामुळे टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. अमेरिकेत, 1990 ते 2020 पर्यंत, दर 10 लाख लोकांमागे मधुमेहाचे 671 रुग्ण आढळले आहेत. संशोधकांनी सांगितले की, शुगरयुक्त सॉफ्ट ड्रिंक मिडल क्लास राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विकली जातात. याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT