Social Media Impact on Mental Health  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mental Health: सोशल मीडियावर दिसणारं जग खरं आहे का?

Social Media Impact: सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक भाग झालंय पण लोकं स्वतःला जेवढी खूश दाखवतायत ती खरंच एवढी खूश आहेत का?

Akshata Chhatre

Social Media Impact on Mental Health

"आठ-नऊ तास आपण काम करतोय, दमतोय, थकतोय.. पण तिचं आयुष्य किती चांगलं आहे. ती रोज सोशल मीडियावर काहीतरी छान पोस्ट करते, ती नेहमी खूश असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ बघून मलाच प्रश्न पडतो मीच का एवढा त्रास सहन करतोय? मी का म्हणून खूश नाहीये?"

तुम्हाला देखील असे प्रश्न पडतात का? सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक भाग झालंय. अनेकजणं तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत होणाऱ्या घडामोडी सोशल मीडियावर टाकतात आणि I am so happy today असे काही कॅप्शन्स बघितले म्हणजे वाचणाऱ्याच्या कपाळावर नक्कीच आठ्या पडतात की 'मी एवढा खुश का नाही?' पण सोशल मीडियावर दिसणारं जग खरं आहे का? लोकं स्वतःला जेवढी खूश दाखवतायत ती खरंच एवढी खूश आहेत का?

सोशल मीडिया आणि मानसिक त्रास:

एक अभ्यास असं सांगतो की दिवसभर मोबाईलची स्क्रीन बघत बसलेल्या लोकांना मानसिक त्रास असू शकतो. जर कोणी सतत मोबाईल बघत असेल तर याचा विपरीत परिणाम मनावर होतो. ब्रिटनमधल्या एका मुलाला सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने एन्झायटी आणि डिप्रेशनचा त्रास झाला होता. त्यामुळे जर का तुम्हाला असं वाटत असेल की सोशल मीडियावर दिसणारं जग मुळातच खुश आहे तर यात काहीही तथ्य नाही.

उलट या सोशल मीडियाच्या जगात 'तो किती खुश आहे' याच विचारत आपण अधिक ताण घेत असतो. स्क्रीनवर दिसणारं आयुष्य आपल्यालाही मिळावं मीच का एवढा अनलकी असा विचार केल्याने मनावर ताण येतो आणि मानसिक आजार बळावण्याची शक्यता वाढते.

यावर उपाय काय?

पण मोबाईल तर आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे आणि करमणुकीसाठी आपण सोशल मीडिया बघतोच मग यावर उपाय काय? एक लक्षात घ्या की सोशल मीडियामुळे तुमचा अधिक वेळ वाया जातोय, कोण काय करतोय आणि आपण किती मागे आहोत या विचार तुम्ही गुरफटून गेलेले आहात.

यापेक्षा कुठेतरी बाहेर फिरून या, निर्सगाच्या सानिध्यात जी मजा आहे ती मोबाईलमध्ये शोधून सापडणार नाही. शिवाय एखादी कला जोपासा, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. घरच्यांसाठी जेवण बनवा, आवडीची गाणी ऐका, एखादं पुस्तक वाचा. सोशल मीडियाचा परिणाम मनावर होऊ द्यायचा नसेल तर काहीतरी उपाय नक्कीच करावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT