Mental Health: चिंताजनक! गोव्यात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण १०० पटींनी जास्त

Depression Rate in Goa: राज्यात नैराश्याचा सामना करणाऱ्यांमध्ये महिलांचा आकडा हा पुरुषांपेक्षा अधिक, नैराश्यात जगत असलेल्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जवळपास १०० टक्क्यांनी जास्ती.
Depression Rate in Goa: राज्यात नैराश्याचा सामना करणाऱ्यांमध्ये महिलांचा आकडा हा पुरुषांपेक्षा अधिक, नैराश्यात जगात असलेल्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जवळपास १०० टक्क्यांनी जास्ती.
Depression Rate in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा आरोग्य विभाग आणि राज्यातील इतर प्राथमिक केंद्रांनी केलेल्या परीक्षणातून हे लक्षात आलंय की राज्यात नैराश्याचा सामना करणाऱ्यांमध्ये महिलांचा आकडा हा पुरुषांपेक्षा अधिक आहे.

नैराश्यात जगत असलेल्या महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा जवळपास १०० टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती समोर आलीये. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन करण्यासाठी आलेल्या ५४० रुग्णांपैकी ३७१ महिला रुग्ण आहेत आणि त्यांचे वयोमान ४५ ते ५४ च्या आसपास आहे.

पर्वरीत संगत नावाच्या एका एनजीओ (NGO)कडून इंप्रेस या नावातर्गत एक उपक्रम राबवला जातोय आणि या उपक्रमात राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि इतर सरकारी आरोग्य सुविधांचा समावेश आहे.

Depression Rate in Goa: राज्यात नैराश्याचा सामना करणाऱ्यांमध्ये महिलांचा आकडा हा पुरुषांपेक्षा अधिक, नैराश्यात जगात असलेल्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जवळपास १०० टक्क्यांनी जास्ती.
Green Oscar: गोमंत कन्येची जागतिक झेप; पटकावला 'वाईल्ड स्क्रीन पांडा' पुरस्कार

संगतने सुरु केलेल्या या उपक्रमांतर्गत राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून (Primary Health centers) काही तज्ज्ञांची निवड केली जाते आणि हे तज्ज्ञ पुढे नैराश्याचा सामना करणाऱ्या लोकांचे समुपदेशन करतात. गोव्यात आत्तापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून जवळपास ९० आरोग्य कर्मचाऱ्यांना याबाबात प्रशिक्षित केले गेले आहे आणि ते सध्या या उपक्रमाची अंमलबजावणी करतायत.

राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक आरोग्य स्तरावर मानसिक आरोग्य तपासणी आणि समुपदेशन समाविष्ट करणारे गोवा हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com