बसल्याजागी झोपणे ठरू शकते मृत्यूचे कारण  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

बसल्याजागी झोपणे ठरू शकते मृत्यूचे कारण

बसून झोपणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

दैनिक गोमन्तक

अनेकवेळा आपण कामामुळे थकून जागेवरच झोपतो. तुम्ही कधी काम (work) करतांना डेक्सवर झोपले आहात का? तुम्ही जर बसल्याजागी झोपत असला तर आरोग्यासाठी (Health) धोकादायक ठरू शकते. बसून झोपण्याचे काय फायदे आणि काय नुकसान आहेत हे जाणून घेवूया.

बसून झोपण्याचे फायदे आणि नुकसान

* गर्भवती महिलासांठी फायदेशीर

गर्भवती महिलांना या काळात खूप काळजी घ्यावी लागते. यामुळे गर्भवती महिलां बसून झोपल्यास त्यांच्या पोटाला आराम आणि पाठीला आधार मिळतो. यामुळे बसून झोपण्याचे फायदा गर्भवती महिलांना होतो.

* स्लिप एपनियामध्ये पासून बचाव

ज्या लोकांना स्लिप एपनिया आहे त्या लोकांना बसून झोपल्याने श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. डोके वरच्या बाजूस असल्याने या लोकांना बसून झोपणे फायदेशीर ठरते.

* पचनाच्या समस्या दूर

ज्या लोकांना अपचनाची समस्या आहे त्या लोकांना बसून झोपण्याचा फायदा होतो.

बसून झोपण्याचे नुकसान

* पाठदुखी

बसून झोपल्याने आपल्या पाठीला एकाच जागी अधिक वेळ राहणे शक्य होत नाही. यामुळे पाठीच्या आणि शरीराच्या वेदना वाढू शकतात.

* रक्तभिसरण बिघडू शकते

बराच वेळ एकाच जागी आणि एकाच स्थितिमध्ये बसून राहिल्यास रक्त वाहिन्यांमध्ये रक्त पुरवठा कमी होऊ शकतो. यामुळे आपल्या शरीराची रक्तभिसरणप्रक्रिया बिघडू शकते.

* सांधे ताठ होऊ शकतात

बसून झोपळल्याने शरीराची हालचाल होत नाही. यामुळे सांधे ताठ होण्याची शक्यता असते. पण अंथरूणात पडून झोपल्याने शरीर ताणले जाऊ शकते. पण बसून झोपल्याने सांधे ताठ होऊ शकतात.

* बसून झोपणे ठरू शकते मृत्यूचे कारण?

बसून झोपल्याने थ्रोम्बोसिस होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. बसून झोपल्याने पायामध्ये रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात. दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून झोपल्याचा हा परिणाम असू शकतो. जर आपण काळजी घेतली नाही तर मृत्यू होण्याची शक्यता असते. डिप व्हेन थ्रोम्बोसिसची लक्षणे म्हणजे पाय दुखणे किंवा त्वचा लालसर पडणे, पायाला सूज येणे यासारखी लक्षणे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

Heart Attack: तुमचं हृदय सेफ आहे का? हिवाळ्याच्या दिवसांत हर्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय; 'हे' उपाय करा, स्वतःची काळजी घ्या

IFFI 2024: ‘विषय हार्ड’; मानवी संबंधांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT