गोडा मसाला (Goda Masala) म्हणेच काळा मसाला असे देखील म्हणतात. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा हा मसाला आहे. यात अनेक औषधीयुक्त पदार्थांचा समावेश समावेश असतो. तसे तर गोडा मसाला आणि काळा मसाला यामध्ये थोडा फरक असतो,जो या मसाल्यात वापरलेल्या पदार्थावर अवलंबून असतो. महाराष्ट्रीयन गोडा मसाला म्हणजे गोड मसाला तर काळा मसाला म्हणजे भाजून तयार केलेला मसाला होय.
* गोडा मसाला लोकप्रिय का आहे?
गोडा मसाला (Goda Masala) महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांना विशिष्ट चव आणि सुगंध देतो. हा मसाला मिसळ पाव, वरण, मसाला भात आणि मासे यासारख्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी टाकतात. या मसाल्ल्यामध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात. यामुळे गोंडा मसाला अधिक प्रमाणात वापरला जातो. अनेक आजारांपासून बचाव करतात.
* गोडा मसाला कसा बनवला जातो?
गोडा मसाला मुळात काही सुगंधी आणि स्वादिष्ट मसाल्ल्यांचे मिश्रण आहे. यात तिळ, जिरे, हिंग, दालचीनी, लाल तिखट, हळद, लवंग आणि वेलायची ही काही सामान्य पदार्थ वापरली जातात. या पदार्थामध्ये एक अनोखी चव येती ती किसलेल्या नारळाची. नंतर यात दालचीनी, हळद, लवंगा आणि जिरे मिक्स करावे. मसाले चांगले भाजून झाल्यानंतर त्याला काळा रंग येतो म्हणूनच त्याला काळा मसाला म्हटले जाते.
घरी गोडा मसाला तयार करण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमच तेल घेवून त्यात 7 चमचे धणे भाजून घ्यावे. नंतर यात जिरे भजून घ्यावे. नंतर तीळ भजून वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यावे. कोरडे खोबरे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजूनज घ्यावे. नंतर थोडे हिंग घालून लाल मिरच्या भाजून घ्याव्या. आता कढईमध्ये थोडे तेल घेऊन सर्व मसाले दालचीनी, तेज पान, काळी मिरी, बडीशेप, लवंग, काळी विलायची, हिरवी विलायची, दगड फूल मिक्स करावे. भाजलेले मसाले थंड होण्यासाठी ठेवावे. नंतर सर्व मसाले बारीक करून घ्यावे. नंतर तयार मसाला एका हवा बंद डब्यात ठेवा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.