Skin In Monsoon: बदलत्या वातावरणाचा आणि हवामानाचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. याचा परिणाम आपल्या त्वचेवरदेखील होतो. ऋतुनुसार आपल्या त्वचेच्या गरजादेखील बदलत असतात.
उन्हाळ्यात त्वचा काळवंडते, काळी पडते. पावसाळ्यात हीच त्वचा कोरडी होते तर थंडीच्या दिवसात तेलकट होते. त्यामुळे ऋतुनुसार त्वचेसाठी केले जाणारे उपाय बदलले पाहिजेत. आपण जर त्वचेची काळजी घेतली नाही तर चेहऱ्यावर पिंपल्सच्या समस्या जाणवू शकतात.
1. वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर
ज्या लोकांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर उपयोगी ठरते. तेल असलेले मॉइश्चरायझर त्वचेला नुकसान पोहचवू शकते. त्यामुळे तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी व्हिटॅमीन-ई ची कॅप्सुल फिल्टर केलेल्या पाण्यात टाकून चेहऱ्याला लावल्यास त्याचा चेहऱ्यावर चांगला परिणाम दिसून येतो.
2. काकडीचा आइस क्युब
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर काकडीचा बर्फाचा क्यूब या त्वचेच्या व्यक्तींसाठी रामबाण उपाय ठरेल. यासाठी काकडीचा रस काढून फ्रीजरमध्ये ठेवा. त्यात मध आणि लिंबाचा रस देखील टाकता येतो. आता हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा.
3. गुलाब पाणी
स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा जेव्हा त्वचा कोरडी वाटेल तेव्हा गुलाबजल स्प्रे करा. तुम्हाला त्यामध्ये आणखी न्युट्रियंट हवे असतील तर त्यात काकडीचा रस घाला, जे अधिक फायदेशीर होईल.
याशिवाय आपण जे पाणी आपल्या दैनंदीन वापरासाठी वापरणार आहे ते स्वच्छ आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी कारण पावसाळ्यात अनेकदा अस्वच्छ पाणी वापरले जाते. आपली त्वचेची गरज ओळखून आपण काळजी घेतली पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.