WhatsApp New Feature: दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये बदल होताना दिसत आहेत. एआयचा मानवाच्या आयुष्यातील वाढता वापर लक्षणीय आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रात होताना दिसत आहे. याचबरोबर, सोशल मिडिया देखील आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे.
व्हॉट्स अॅप मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. याद्वारे आपण जगात कुठेही कनेक्ट होऊ शकतो. आता व्हॉट्स अॅप एक नवीन फीचर घेऊन आले आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, व्हॉट्स अॅपने व्हिडिओ कॉल करण्याची लिमिटमध्ये वाढ केली आहे.
व्हॉट्सअॅप अँड्रॉईड यूजर्ससाठी नवीन कॉलिंग फीचर आणत आहे. हे वैशिष्ट्य तुम्हाला एका कॉलमध्ये 15 लोकांना जोडण्याची परवानगी देईल. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह व्हिडिओ कॉल करू शकता. हे फिचर सध्या सर्व युजरसाठी उपलब्ध नाही, परंतु लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे.
या नवीन फीचरमुळे वापरकर्त्यांचा वेळ वाचणार आहे. हे नवीन फीचर व्हॉट्सअॅप अँड्रॉइड बीटा 2.23.15.14 गुगल प्ले स्टोअर अपडेटसह लागू करण्यात आले आहे. हे अपडेट लवकरच इतरांसाठी देखील हे फीचर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
अॅनिमेटेड अवतार फीचर
व्हॉट्सअॅपने नवीन अॅनिमेटेड अवतार फीचर आणले आहे. हे फीचर iOS आणि Android दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरद्वारे आपण चॅटमध्ये अॅनिमेटेड अवतार चा वापर करु शकतो. व्हॉट्स अॅप द्वारे संवाद साधला जातो त्यामध्ये हा अॅनिमेटेड अवतार इंटरेस्ट निर्माण करणार असल्याचे म्हटले जात आहे.
आता व्हॉट्स अॅपमध्ये आणखी काय बदल होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आता लवकरच 15 जणांपर्यत व्हिडिओकॉलची वाढलेली लिमिट सर्वांकडे उपलब्ध होत असल्याने व्हॉट्स अॅपच्या या अपडेट बद्दल उत्सुकता दिसून येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.