Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips: चेहऱ्यावरचे काळे डाग घालवण्यासाठी घरातील 'या' वस्तू पडतील उपयोगी

Skin Care Tips: ज्यांच्या चेहऱ्यावर सतत मुरुम येत असतील त्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग दिसून येतात.

दैनिक गोमन्तक

Skin Care Tips: प्रत्येकालाच आपले सौंदर्य प्रिय असते. ते टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र कधी कधी चेहऱ्यावरचे डाग आपल्या सौंदर्यात बाधा आणताना दिसतात. ज्यांच्या चेहऱ्यावर सतत मुरुम येत असतील त्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग दिसून येतात. चेहऱ्यावरील असे डाग आपण घरातील काही वस्तू वापरुन आयुर्वेदिक उपाय करुन हे डाग घालवण्याचा प्रयत्न करु शकतो.

कोरफड

कोरफडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत हे अनेक अभ्यासांमध्ये दिसून आले आहे. कोरफड मेलॅनिनचे तयार होणे नियंत्रित करते. त्यामुळे तुमचे डाग कमी होण्यास मदत होऊ शकते असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.

कांदा

डाग कमी करण्यासाठी कांदा फायदेशीर ठरतो. कांद्याच्या रसाचा वापर केल्याने जखमा लवकर बऱ्या होताना दिसतात. लालसरपणा कमी होते आणि त्वचा लक्षणीयरीत्या कोमल होताना दिसली आहे. इतर अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की कांद्याचा गर केलोइड्स आणि हायपरट्रॉफिक चट्ट्यांवर वर प्रभावी आहेत.

हळद

हळद नेहमीच आपल्या त्वचेसाठी उत्तम मानली जाते. जर तुमची त्वचा काळवंडली असेल तरीदेखील तुम्ही हळदीचा वापर करुन फेसमास्क तयार करु शकता. यासोबत डाग कमी करण्यासाठी हळद उपयुक्त ठरू शकते कारण त्यात कर्क्यूमिन, दाहक-विरोधी गुणधर्म असलेले संयुग असते.

गुलाब तेल

असे म्हटले जाते की गुलाबाच्या झाडापासून तयार केलेले गुलाबाचे तेल डागांसाठी उत्तम मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

SCROLL FOR NEXT