Milk Cream Facepack for Glowing Skin Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Milk Facepack: नितळ त्वचेसाठी दुधावरील साय ठरेल गुणकारी! बनवा 'हे' 3 फेसपॅक

सुंदर त्वचेसाठी आपल्यापैकी अनेकजण किचनमधील विविध गोष्टी वापरतात.

Kavya Powar

Milk Cream Facepack for Glowing Skin: सुंदर त्वचेसाठी आपल्यापैकी अनेकजण किचनमधील विविध गोष्टी वापरतात. नितळ त्वचेसाठी बऱ्याच प्रोडक्टसमध्ये दुधाचा वापर केला जातो. दुधावरील साय त्वचेसाठी पोषक मानली जाते.

दुधावरची साय चेहऱ्याला लावल्याने चेहरा मॉइश्चराइज होतो. याशिवाय साय लावल्याने चेहऱ्यावरील घाण पूर्णपणे निघून जाते आणि चेहऱ्याची त्वचा चमकदार बनते. दुधावरील साय वापरुन फेस पॅक तयार केल्यास चेहऱ्याच्या अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते.

'या' फेसपॅकमुळे उजळेल चेहरा

दुधावरील साय आणि मधाचा फेसपॅक

साय आणि मधाचे मिश्रण चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे चेहरा मॉइश्चराइझ होतो आणि चेहऱ्यावरील चमकही वाढते. हा फेस पॅक तयार करण्यासाठी साय आणि मध समान प्रमाणात घ्या आणि चेहऱ्याला लावा. साधारण 20 मिनिटे ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक लावा.

साय आणि हळद

दुधावरील साय आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. यामुळे तुमचा चेहरा मऊ बनतो. यासाठी एका भांड्यात हळद पावडर, गुलाबजल साय घ्या. हा फेसपॅक 15 मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

साय आणि बेसन

बेसन चेहऱ्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहे. यात साय मिळसून त्याचा फेसपॅक लावल्यास चेहऱ्यावरील मुरूम आणि डाग गायब होतात. यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा हा फेसपॅक लावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: 13 वर्षीय वैभवसाठी राजस्थानने मोजले 1.1 कोटी

St. Francis Xavier Exposition: गोयचो सायब पावलो!! शव प्रदर्शन सोहळ्याला 170 पाकिस्तानी गोव्यात येणार; व्हिसा मंजूर झाल्याने मार्ग मोकळा

Quepem Crime: पारोडातील महिलेच्या हत्येचे गूढ उकलले,सहा दिवसांनी संशयिताला मध्य प्रदेशातून अटक

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

SCROLL FOR NEXT