Side Effects of Using Copper Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Copper: तुम्हीही उन्हाळ्यात तांब्याची भांडी वापरताय? होउ शकतात 'हे' दुष्परिणाम

जर हिवाळ्यात तांब्याची भांडी वापरणे फायदेशीर ठरत असेल तर हीच तांब्याची भांडी उन्हाळ्यात तुमचे आरोग्य धोक्यात पाडु शकते.

दैनिक गोमन्तक

Side Effects of Using Copper: सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे फायदे तर तुम्ही ऐकलेच असतील, पण तुम्हाला तांब्याच्या भांड्यांचा योग्य वापर माहित आहे का? जर हिवाळ्यात तांब्याच्या भांड्यांचा वापर फायदेशीर असेल तर उन्हाळ्यात हीच तांब्याची भांडी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरणार आहे.

  • उन्हाळ्यात करु नका वापर

उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने अन्नातील कॉपरचे प्रमाण वाढते. ज्यामुळे आरोग्याला मोठी हानी होते. याशिवाय उन्हाळ्यात शरीराचे तापमानही वाढते. जर तुम्ही तांब्याचे भांडे जेवणासाठी वापरत असाल तर ते तुमचे आरोग्य (Health) निरोगी राहण्याएवजी खराब होउ शकते.

  • उन्हाळ्यात तांब्याची भांडी वापरण्याचे नुकसान

- भूक न लागणे.

- शरीराच्या तापमानात वाढ होणे

- अतिसार होणे

- ब्लोटिंगची समस्या

- आयुर्वेदानुसार तांब्याचा उपयोग भस्म म्हणून केला जातो. यामध्ये तांब्याचे धातूचे गुणधर्म वापरले जातात. कच्च्या तांब्यामध्ये पाणी प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचते. त्यामुळे दातांची झीज होते.

  • तांब्याच्या भांड्यांचा वापर करताना लक्षात ठेवा या गोष्टी

- उन्हाळ्यात तुम्ही सकाळी उपाशी पोटी एकदाच तांब्याचे पाणी पिऊ शकता.

- स्वयंपाकासाठी तांब्याची भांडी वापरल्याने पचनाच्या समस्या वाढू शकतात.

- तांब्याच्या भांड्यात आंबट पदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब होण्याची समस्या असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT