Premanand Maharaj on Betrayal: आध्यात्मिक प्रवचनांमुळे सध्या तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले प्रेमानंद महाराज यांचे विचार नेहमीच अनेकांना प्रेरणा देतात. त्यांची प्रवचने ऐकून लाखो लोकांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. महाराज अत्यंत सोप्या भाषेत लोकांच्या समस्यांवर उपाय सांगतात. नुकत्याच एका 'एकांतिक वार्ता' सत्रात एका महिला भक्ताने प्रेमानंद महाराजांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, जो आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा समोर येतो.
महिला भक्ताने विचारले की, "एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे क्षमा मागून सुधारण्याची संधी मागत असेल आणि तिला सन्मार्गावर यायचे असेल, तर ती संधी द्यावी की नाही?" या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांनी अत्यंत मोलाचे उत्तर दिले.
ते म्हणाले, "आपण त्या व्यक्तीला सुधारण्याची संधी दिलीच पाहिजे. चूक कोणाकडूनही होऊ शकते. कधीकधी चांगल्या लोकांकडूनही चूक होते. वाईट संगतीमुळे किंवा आपल्या वासनांच्या आहारी जाऊन एखाद्याकडून चूक झाली असेल आणि आता त्याला पश्चात्ताप होत असेल की, 'मला एकदा संधी द्या. मी आयुष्यात पुन्हा अशी चूक करणार नाही,' तर त्याला ती संधी द्यायला हवी."
याचवेळी, प्रेमानंद महाराजांनी दुसरा पैलूही स्पष्ट केला. ते म्हणाले, "मला वाटते की एकदा संधी द्यायला हवी, एकदा क्षमा करायला हवी. पण जर तीच व्यक्ती वारंवार तीच चूक करत असेल, तर याचा अर्थ तो नाटक करत आहे.
"महाराज पुढे म्हणतात, "अनेकदा आपल्या हृदयातूनच आपल्याला वाटते की, 'माझ्याकडून चूक झाली आहे आणि मला जर एकदा संधी मिळाली, तर मी आयुष्यात कधीही चूक करणार नाही.' जर एखाद्याचा असा प्रामाणिक स्वभाव असेल, तर त्याला संधी दिलीच पाहिजे."
मात्र, जर एखादी व्यक्ती वारंवार चुका करत असेल, तर तो ढोंग करत असल्याचे समजावे आणि अशा व्यक्तीला क्षमा न करता त्याला शिक्षाच दिली पाहिजे, असा स्पष्ट संदेश प्रेमानंद महाराजांनी दिला. त्यांच्या या विचारांमुळे जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी लोकांना नवी दिशा मिळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.