Shopping Tips
Shopping Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shopping Tips: कपड्यांची खरेदी करताना 'या' टिप्स करा फॉलो, होणार नाही खिशा रिकामा

Puja Bonkile

Shopping Tips: शॉपिंग करायला सर्वांनाच आवडते. मार्केटमध्ये नव्या गोष्टी आल्या की अनेक जण शॉपिंगसाठी बाहेर पडतात. अनेक लोकांना कपड्यांची शॉपिंग करायला आवडते. पण तुम्हाला जर आर्थिक ताण न येता खरेदी करायची असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.

जर तुम्ही स्मार्ट शॉपिंग करत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीचा पोशाख खरेदी करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. 

  • बजेट ठरवावे

कपड्यांची खरेदी करताना अतिरिक्त पैसे खर्च करणे टाळायचे असेल, तर त्यासाठी आधी बजेट ठरवावे. खरेदीसाठी बाहेर जाण्यापुर्वी बजेट बनवावा आणि तेवढेच पैसे सोबत घेऊन जावे. यामुळे तुमच्या पैशाची बचत होण्यास मदत मिळेल. जर तुम्हाला कपड्यांची खरेदी करताना पैसे वाचवायचे असतील तर सीझन एंड किंवा ऑफ सीझनमध्ये शॉपिंग करावी. यामुळे तुम्हाला ब्रँडेड आणि चांगल्या दर्जाचे कपडे अगदी कमी किमतीत मिळू शकतात.

  • कपडे भाड्याने घ्यावे

कधीकधी आपण पार्टी किंवा फंक्शनमध्ये खास दिसण्यासाठी कपडे खरेदी करतो. परंतु ते एक किंवा दोनपेक्षा जास्त वेळ घालत नाही. प्रत्येकवेळी नवे कपडे खरेदी करण्याएवजी तुम्ही कपडे भाड्याने घेऊ शकता. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे कपडे भाड्याने सहज मिळतात. यामुळे तुम्ही पैशांची बचत करू शकता.

  • स्ट्रीट शॉपिंग

कपड्यांची खरेदी करताना पैसे वाचवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे स्ट्रीट शॉपिंग होय. तुम्हाला जर कमी किमतीत अतिशय स्टायलिश कपडे खरेदी करायचे असेल तर स्ट्रीट शॉपिंग करावे. जर तुमच्याकडे बार्गेनिंग करण्याचे स्क्रिल असेल तर तुम्ही कमी किंमतीत चांगली कपड्यांची शॉपिंग करू शकता.

  • कॅशबॅक आणि रिवॉर्ड्सचा करा वापरा

कपड्यांची खरेदी करताना तुम्ही पेमेंट कसे करता यावरून देखील पैशांची बचत करता येते. उदाहरणार्थ, काही क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्स ऑफर करतात. जे तुम्ही रिपीट खरेदीवर वापरू शकता. याच्या मदतीने तुम्ही पुढच्या वेळी कपड्यांच्या खरेदीसाठी जाल तेव्हा खूप पैसे वाचवू शकता. एवढेच नाही तर तुमच्याकडे कोणत्याही ब्रँडचे कूपन असतील तर तुम्ही त्यांचा वापर करून अतिरिक्त सवलत मिळवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Monsoon Session Live: TCP, आरोग्य खात्यासंबधित प्रश्नोत्तराचा तास, मंत्री राणे निशाण्यावर

Goa Live News Today: डिचोलीत रात्रीत दोन मंदिरे फोडली

Goa Assembly Session: ‘आदिवासीबहुल' असा तिसरा जिल्हा व्हावा; सभापतींचे मत

Goa Assembly Session: ...तर एक लाखापर्यंत दंड आणि कैदेचीही शिक्षा; मोन्सेरात यांची माहिती

Goa Assembly Session: ‘गोवा माईल्स’वरुन विरोधक आक्रमक; एकाधिकारशाहीचा आरोप

SCROLL FOR NEXT