Grocery Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Online Shopping: किराणा सामान ऑनलाईन खरेदी करताय? मग 'या' 5 गोष्टी ठेवा लक्षात

किराणा सामान ऑनलाईन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Online Shopping Tips : अनेक लोक किराणा सामान ऑनलाईन खरेदी करतात. यामुळे वेळेची बचत होते. पण ऑनलाईन खरेदी करताना बजेट तयार करावे. कोणत्याही ऑफर्सच्या मोहात अडकु नये. यामुळे तुमच्यावर आर्थिक ताण येणार नाही.

ऑनलाईन किराणा सामान खरेदी करताना कोणत्या गोष्टींचे पालन करावे

आवश्यक वस्तूंची यादी

सर्वात पहिले गरजेच्या वस्तुंची यादी तयार करावी. तुम्हाला किती आणि कोणते सामान खरेदी करायचे आहे हे ठरवावे. यादी बनवल्याने गरजेच्या वस्तु खरेदी करणार नाही. यामुळे पैशाची बचत होते.

वेबसाइट्सची तुलना करा

एकदा तुम्ही तुमच्या गरजेच्या वस्तुंची यादी तयार केली की विविध वेबसाइट्सची तुलना करावी. वेगवेगळ्या वेबसाइट्सवर प्रोडक्टच्या किंमती आणि उपलब्धता लक्षणीयरीत्या बदलू शकतात. कार्टमध्ये फक्त त्या वस्तू ठेवा ज्यांची किंमत तुमच्या बजेटसाठी योग्य आहे. यामुळे तुम्ही अनावश्यक खर्च टाळू शकता.

ऑफर्सला बळी पडू नका

अनेक वेबसाइट प्रोडक्टवर सुट आणि ऑफर देतात . या ऑफर्सचा योग्य फायदा घेऊन तुम्ही पैशांची बचत करू शकता. परंतु तुम्हाला हे प्रोडक्ट जास्त ऑफरमध्ये मिळत असल्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करू नका. तुम्हाला गरज नसलेल्या जास्त किमतीच्या वस्तू खरेदी केल्याने तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागतील.

फॅन्सी वस्तु टाळा

तुम्ही मोठ्या प्रमाणात किराणा सामान खरेदी करत असल्यास फ्रि डिलावरी मिळवण्यासाठी प्रयत्न करा. हे तुम्हाला पैसे वाचविण्यात मदत करेल. तसेच, तुमच्या सामानामध्ये फक्त त्या वस्तूंचा समावेश करण्याचा प्रयत्न करा जे किफायतशीर आणि पूरक आहेत. फॅन्सी आयटम तुमचे बजेट वाढवू शकतात.

रिटर्न पॉलिसी

जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट आवडला नाही किंवा खराब निघाला असेल तर कंपनी चांगली रिटर्न पॉलिसी देते का याची खात्री करावी. या प्रोसेसमध्ये वेळ जास्त लागेल. पण यामुळे तुमचे पैसे वाया जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Goa Government Jobs: 'निवड आयोगा'तर्फे विविध खात्‍यांतील रिक्‍त पदांची भरती! 24 तासांत लागणार निकाल

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

SCROLL FOR NEXT