Scientific Discovery Human Lifespan Dainik Gomantak
लाइफस्टाइल

स्वप्न नव्हे, सत्य! आता 100 वर्षे जगा, साठीतही घ्या तरुणाईचा अनुभव; 'हे' 5 उपाय आहेत फायदेशीर, वैज्ञानिकांचा दावा

Scientific Discovery Human Lifespan: प्रत्येकाला वाटते की आपण कधीच म्हातारे होऊ नये. शरीरात नेहमी तरुणाईसारखी ताकद आणि जोश असावा.

Manish Jadhav

Scientific Discovery Human Lifespan: प्रत्येकाला वाटते की आपण कधीच म्हातारे होऊ नये. शरीरात नेहमी तरुणाईसारखी ताकद आणि जोश असावा. पण आजकाल 40 वर्षानंतरच शरीरात अशक्तपणा जाणवू लागला आहे. एवढचं नाहीतर 60 पर्यंत केस पांढरे होणे, शरीर वाकणे, हे सर्व म्हातारपणाची चाहूल देऊ लागले आहे. पण आपले पूर्वज 100 वर्षांहून अधिक जगत होते आणि 60-70च्या वयातही तरुण असल्यासारखे वाटत होते.

याचदरम्यान आता वैज्ञानिकांनी अशी बातमी दिली की, जी तुम्हाला आनंद देऊ शकते. शास्त्रज्ञांनी दावा केला की, येत्या काळात माणूस सहजपणे 100 वर्षे जगू शकेल. आता म्हातारपण येण्याचे वयही पुढे ढकलले जाऊ शकते. याबद्दल सध्या डीएनए आणि ब्लॅक अँड व्हाईट (DNA and Black & White) सारख्या न्यूज शोमध्ये खूप चर्चा केली जात आहे.

100 वर्षे जगण्याचा मार्ग: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल

टीव्ही न्यूज रिपोर्टमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum) अहवालाचा हवाला देत माहिती देण्यात आली आहे. यात वैज्ञानिकांनी दावा केला की, 2030 पर्यंत विकसित देशांमधील प्रत्येक तिसरे बाळ 100 वर्षांपर्यंत जगू शकेल. 60 वर्षांचे वय हे जीवनाचा मधला भाग बनेल आणि या वयातही 40 वर्षांइतकी ऊर्जा राहील. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) मतेही, 2030 नंतर 100 वर्षांपर्यंत जगणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय वाढेल.

आयुर्मान वाढण्याची कारणे

दरम्यान, या अहवालापूर्वीही अनेक अहवालांनी विकसित देशांमध्ये लोकांचे वय जास्त असण्याबद्दल सांगितले आहे. कारण तिथे चांगले अन्न आणि पेय, उत्तम वैद्यकीय पायाभूत सुविधा (Medical Infrastructure) उपलब्ध आहेत, ज्यामुळे जीवनातील ताण आणि आव्हाने कमी होतात. जपानमध्ये 100 वर्षांवरील लोक सर्वाधिक राहतात, जो एक विकसित देश आहे.

दीर्घायुष्यासाठी आवश्यक गोष्टी

आयुर्मान वाढवण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

तणावापासून दूर राहा: दीर्घायुष्यासाठी सर्वात आधी तणावापासून दूर राहणे आणि तो व्यवस्थापित करण्याची पद्धत येणे आवश्यक आहे. नेचर एजिंगच्या (Nature Aging) अहवालातून असे दिसून येते की, तणावामुळे आयुष्य कमी होऊ शकते आणि वाढत्या वयामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो.

नियमित व्यायाम करा: जास्त जगायचे असेल तर जास्तीत जास्त व्यायाम केला पाहिजे. यामुळे स्नायू विकसित होतात आणि वाढत्या वयानुसार शरीर कमकुवत होण्याचा धोका कमी होतो. म्हातारपणात येणारा अशक्तपणा आणि थकवा दूर करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

प्रक्रिया केलेले आणि अल्ट्रा-प्रोसेस केलेले अन्न टाळा: आहारात प्रक्रिया केलेले, अल्ट्रा-प्रोसेस केलेले अन्न आणि तेलाचे जास्त सेवन थांबवावे. यामुळे 'ट्रान्स फॅट' मिळते, ज्यामुळे अनेक धोकादायक आजार होऊ शकतात. हे लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका (Heart Attack), कर्करोग आणि फॅटी लिव्हरशी जोडले जाते.

प्रथिने वाढवा: आहारात डाळी, कडधान्ये, मासे, चिकनमधून प्रथिने (Protein) नक्की घ्या. हे आपल्या स्नायू, हाडे, केस आणि त्वचेसाठी आवश्यक आहे. यामुळे त्वचेत घट्टपणा येतो आणि शरीर नेहमी निरोगी दिसते.

तंबाखू आणि दारुपासून दूर राहा: तंबाखू आणि दारुचे सेवन पेशींना खराब करु शकते. यामुळे वृद्धत्वाची लक्षणे वेगाने येतात आणि अनेक आजार होऊ शकतात. हे हृदयविकार, स्ट्रोक आणि कर्करोगाचे प्रमुख कारण मानले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात धर्मांतरविरोधी कठोर कायदा करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी

Government Employees: वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सरकारी कर्मचारी घेऊ शकतात 30 दिवसांची रजा, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टच सांगितलं

Viral Video: नवा जुगाड, नवा व्हिडिओ! सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्हीही म्हणाल, 'क्या बात है!'

'म्हादई आमची लढाई, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही'; प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यानंतर DK शिवकुमारांचा इशारा

August 2025 Horoscope: मेष ते मीन... ऑगस्टमध्ये 'या' 5 राशींच्या कुंडलीत अशुभ योग, खर्च आणि तणावात वाढ!

SCROLL FOR NEXT