Saving Account Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Saving Account: सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवता येतात फक्त इतकेच पैसे; मर्यादेपेक्षा जास्त पैसे ठेवल्यावर काय होते, जाणून घ्या एका क्लिकवर

सेविंग अकाउंटमध्ये व्यवहाराची बंधणे नाहीत. पण एखाद्या आर्थिक वर्षात ठराविक रक्कम जादा जमा झाली तर त्याची माहिती आयकर विभागाला मिळते.

Puja Bonkile

Saving Account: सेविंग अकाउंटमध्ये व्यवहाराची बंधणे नाहीत. पण एखाद्या आर्थिक वर्षात ठराविक रक्कम जादा जमा झाली तर त्याची माहिती आयकर विभागाला मिळते. तसेच सेविंग अकाउंट असलेल्या व्यक्तीला देखील ही माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल.

याशिवाय, बचत खात्याचे उत्पन्न देखील करपात्र आहे. आजच्या युगात श्रीमंत असो की गरीब, प्रत्येक व्यक्तीचे बँक अकाउंट नक्कीच असते. कारण पगारापासून ते मजुरी आणि इतर सरकारी योजनांचे पैसे थेट अकाउंटमध्ये येतात. बँकांमध्ये अकाउंट उघडण्यासाठी बचत, चालू आणि पगार अकाउंट असे अनेक पर्याय आहेत. पण देशातील बहुतांश लोकांकडे सेविंग अकाउंट आहे

देशातील अनेक लोकांचे व्यवहार हे सेविंग अकाउंटमधून होतात. पण सेविमग अकाउंटमध्ये किती पैसे ठेवले पाहिजेत हे तुम्हाला माहिती आहे का? तसे, सेविंग अकाउंटमध्ये जमा केलेल्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. पण, जर सेविंग अकाउंटमध्ये जमा केलेले पैसे इनकम टॅक्सच्या क्षेत्रात येत असतील तर तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागेल.

यासोबतच सेविंग अकाउंटवर मिळणाऱ्या व्याजावरही टॅक्स भरावा लागतो. पण याच्याशी संबंधित काही नियमही आहेत. आयकर कायदा कलम 80TTA अंतर्गत, सामान्य लोकांच्या सेविंग अकाउंटवर आर्थिक वर्षात 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. यापेक्षा जास्त व्याजाची रक्कम असल्यास टॅक्स भरावा लागतो. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत आहे.

इतकेच नाही तर सेविंग अकाउंटमधून मिळणारे व्याज तुमच्या इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात जोडले जाते आणि त्यानंतर तुम्हाला संबंधित टॅक्स कंसानुसार एकूण उत्पन्नावर टॅक्स भरावा लागतो.

देशातील प्रमुख सार्वजनिक आणि खाजगी बँका सेविंग अकाउंटवर 2.70 टक्के ते 4 टक्के व्याज देत आहेत. सेविंग अकाउंटवर 10 कोटी रुपयांपर्यंत 2.70 टक्के आणि 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी 3 टक्के व्याजदर आहे. याशिवाय अनेक छोटे वित्त बँका सेविंग अकाउंटवर अटींसह 7% पर्यंत व्याज देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT