Sankasti Chaturthi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sankasti Chaturthi: संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पासाठी बनवा स्वादिष्ट मोदक!

आज संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. बाप्पांना मोदक खुप प्रिय आहे.

Puja Bonkile

Sankasti Chaturthi Special Story: कोणत्याही कामाची सुरुवात ही श्री गणेशाने केली जाते. शास्त्रात देखील गणपती बाप्पाच्या पुजेला खुप महत्व आहे. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात.

पण बाप्पाला खुप मोदक प्रिय आहे. उकडीची किंवा तळलेले मोदक बनवले जातात. चला तर मग जाणून घेऊया तळलेले मोदक कसे बनवायचे.

  • लागणारे साहित्य

  1. गव्हाचे पीठ

  2. मीठ

  3. तेल

  4. पाणी

  5. गूळ पावडर

  6. नारळ

  7. पांढरे तीळ

  8. विलायची पावडर

  9. जायफळ

  10. गरजेनुसार पाणी

  • मोदक बनवण्याची कृती

बाप्पासाठी तळलेले मोदक बनवण्यासाठी सर्वात पहिले पीठ मळून घ्यायचे आहे. यासाठी पीठ, मीठ, तेल एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ जास्त मऊ नसावे. पीठ बनवल्यानंतर झाकण ठेवून 20 ते 30 मिनिटे ठेवा.

सारण तयार कराण्यासाठी गूळ पावडर, किसलेले खोबरे, तीळ, वेलची पावडर आणि जायफळ एकत्र करावे.

मध्यम आचेवर हे मिश्रण शिजवा आणि मिश्रण मऊ, शिजलेले आणि ओलसर होईपर्यंत मिक्स करत रहावे.

आता पिठाचा एक छोटा गोळा घ्या आणि तळहातावर लाटून गोळा तयार करा. नंतर त्यावर हलकेच पीठ लावून लाटून घ्या.

कणकेची ही छोटी चपाती हाताच्या तळहातावर घ्या. आता मधोमध 2 ते 3 चमचे बनवलेले सारण भरावे. काठावर थोडे पाणी लावा. मग उकडीचे मोदक बनवतो तसेच तयार करून घ्या. मोदक चांगले बंद करा.

कढईत तेल मध्यम आचेवर गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात मोदक घालावे. ते हलके सोनेरी आणि कुरकुरीत होइपर्यंत तळावे.

तसेच उरलेले मोदक तळून घ्या. पूजेच्या वेळी गणेशाला तळलेले मोदक अर्पण करावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT