Weight Loss Tips: धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. सध्या वाढलेले वजन ही एक मोटी समस्या बनली आहे.
यासाठी वर्कआउट, योगा यासारख्या काही गोष्टींचे सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते. यासाठी तुम्ही मधाचा वापर करु शकता. मध आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की मधासोबत हिंग रिकाम्या पोटी खाल्ल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
हे आहेत फायदे
जर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या असेल तर तुम्ही हिंगाचे मधासोबत सेवन करू शकता. दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे केवळ सूज दूर करण्यासाठी उपयुक्त नाहीत तर ब्लोटिंगच्या समस्येपासून देखील आराम देतात.
जर तुम्हाला तुमचे वजन कमी (Weight Loss) करायचे असेल तर तुम्ही हिंग मधासोबत मिक्स शकता. या दोन्ही पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट घटक आढळतात. जे पचन संस्था सुरळित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
जर तुम्ही अपचनाची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहारात हिंग आणि मध घालू शकता. या दोन्ही पदार्थांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. जे अन्न जलद पचण्यास मदत करतात. यासोबतच पोटाचा पीएच संतुलित करण्यासाठीही तुमचा खूप उपयोग होतो.
हिंग आणि मध त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. या दोन्हीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास केवळ शरीराला डिटॉक्सिफाई करता येत नाही, तर त्वचेच्या (Skin) समस्यांपासूनही आराम मिळतो.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.