Samantha myositis story Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Samantha Ruth Prabhu: "शरीराची योग्य काळजी घेतली नाही तर..." मायोसिटिसवर काय म्हणाली सामंथा?

Myositis Awareness: आता ती स्वतःच्या अनुभवातून निरोगी जीवनशैली महत्वाची का हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय

Akshata Chhatre

Samantha Ruth Prabhu Interview: दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने निरोगी जीवनशैलीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. दोन वर्षांपूर्वी मायोसिटिस या ऑटोइम्यून आजाराबद्दल उघडपणे बोलल्यानंतर, सामंथा अनेक लोकांसाठी प्रेरणास्रोत ठरली आहे. आता ती स्वतःच्या अनुभवातून निरोगी जीवनशैली महत्वाची का हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय. 

सामंथा म्हणते, "मी एका स्टारच्या भूमिकेतून बोलत नाहीये, तर एक अशी व्यक्ती म्हणून बोलत आहे जी स्वतः एका आजाराशी झुंज देत होती. जेव्हा तुम्हाला एखादा आजरा होतो, तेव्हा हतबल वाटू शकतं. त्यामुळे, माझा अनुभव सांगण्याची गरज वाटते जेणेकरून अशा परिस्थितीत असलेल्या लोकांना थोडा आधार मिळू शकेल. आजारांचा सामना करणाऱ्या लोकांना एक छोटी मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे." असं ती म्हणते. 

ती पुढे म्हणाली, "खरंतर आपल्याला फारमोठी समस्या येईपर्यंत आरोग्याची काळजी वाटत नाही. आरोग्य बिघडल्यावरच खऱ्या अडचणी काय हे समजतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाचे कर्णधार असलं पाहिजे. सामंथासाठी निरोगी जीवनशैली आता तिच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनली आहे. "मला आता 'चीट मील्स' किंवा 'चीट डे' ची गरज भासत नाही. मला माझं आरोग्य, शरीर आणि मन यांना प्राधान्य देण्यात आनंद मिळतो," असं ती म्हणाली. 

"तुमचं शरीर तुम्हाला नक्की साथ देईल आणि तुमच्या गरजेनुसार प्रतिसाद देईल, पण त्यासाठी तुम्ही त्याचा आदर करणं गरजेचं आहे. आपण स्वतःला त्रास देत राहिलो आणि शरीराची योग्य काळजी घेतली नाही, तर ते चांगलं काम करण्याची अपेक्षा कशी करू शकतो?

मोठी ध्येये असणं महत्त्वाचं आहे, पण त्याच वेळी आपल्या शरीराचं ऐकणंही आवश्यक आहे." असं म्हणत सामंथाने शरीराला आपण किती महत्व दिलं पाहिजे यावर लक्ष वेधून घेतलं.

सामंथाने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यालाही प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली आणि त्यासाठी नियमित दिनचर्या किती महत्त्वाची आहे हे सांगितले. "माझा दिवस खराब असू शकतो, पण जर मी माझी नेहमीची दिनचर्या पूर्ण केली, तर मनात येणारे वाईट विचार मी विसरून जाते. काही दिनचर्या किती प्रभावी ठरू शकतात याचा अंदाज आपण लावू शकत नाही. ते कदाचित कंटाळवाणे वाटू शकतं, पण दीर्घकाळात याच गोष्टींनी मला मदत केली आहे," असं ती म्हणाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT