Rose Day Recipe
Rose Day Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rose Day Special 2023: व्हॅलेंटाईन डेचा पहिला दिवस बनवा गुलाबापासून बनलेल्या स्वादिष्ट पदार्थांनी खास

दैनिक गोमन्तक

Valentine Day Special Recipe: व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात आज रोज डे ने झाली आहे. प्रेमाचा हा आठवडा खास बनवण्यासाठी लव्ह बर्ड्स कोणतीही कसर सोडत नाहीत. व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी रोज डे साजरा केला जातो. हा दिवस तुमच्या जोडीदारासोबत खास बनवण्यासाठी आणि नात्यात गोडवा आणण्यासाठी रोजपासून बनवलेले पदार्थ खायला द्या. ज्यांचे पार्टनर फूडी आहेत त्यांच्यासाठी हे लाडू उत्तम पर्याय आहेत. ही डिश तुमच्या जोडीदाराचा मूड सुधारेल. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया गुलाबापासून बर्फी आणि लाडू कसे बनवायचे.

  • गुलाबाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१/४ कप दूध

४-५ थेंब रोझ एसेन्स

एक चमचा तूप

सुक्या गुलाबाच्या पाकळ्या

दीड कप मिल्क पावडर

३ चमचे गुलकंद

एक चमचा गुलाबाचे सिरप

rose laddu
  • गुलाबाचे लाडू बनवण्याची कृती

गुलाबाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात पहिले नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे.

यानंतर दूध गरम करून त्यात मिल्क पावडर घालावे.

दुधाची पावडर चांगली मिक्स झाल्यावर त्यात रोझ सिरप, कंडेन्स्ड मिल्क आणि रोझ इसेन्स घालावे.

नंतर सर्व गोष्टी चांगले मिक्स करावे.

यानंतर एका प्लेटला तूप लावावे.

हे मिश्रण पॅनचे बेस सोडू लागेल तेव्हा ते झाले असे समजा.

हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवावे.

ते थंड झाल्यावर हाताने मॅश करून गुळगुळीत करावे.

आता हाताला तूप लावून त्याचे छोटे गोळे बनवा.

त्यात गुलकंदचे छोटे गोळे ठेवा आणि लाडू बांधावे.

लाडू बनवल्यानंतर त्यावर सिल्व्हर वर्क आणि पिस्त्याचे काप ठेवून वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवू शकता.

तुमचे स्वादिष्ट गुलाब लाडू तयार आहेत.

गुलाब बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  1. एक कप बदाम

  2. अर्धी वाटी पाणी

  3. एक चमचा तूप

  4. एक वाटी किसलेले खोबरे

  5. अर्धी वाटी साखर

rose barfi

गुलाब बर्फी बनवण्याची पद्धत


गुलाब बर्फी बनवण्यासाठी प्रथम गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून बाजूला ठेवा. याशिवाय कोमट पाण्यात एक ते दोन तास खोबरे भिजत ठेवावे, जेणेकरून ते चोळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आता इतर सर्व साहित्य एका भांड्यात काढून चिरून घ्या.हा खवा मॅश केल्यानंतर त्यात नारळ आणि गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. आता गॅसवर एका भांड्यात तूप गरम करून त्यात काजू घाला आणि हलका तपकिरी होईपर्यंत शिजवा.

सुक्या मेव्याचा रंग सोनेरी झाला की बाहेर काढून बाजूला ठेवा.आता वेलची, खोबरे, साखर, खवा हलका तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. साखर नीट मिसळली की ताटात काढून पसरवावी.आता या मिश्रणाच्या वर बदाम ठेवून बर्फीच्या आकारात कापून थंड होण्यासाठी ठेवा.या बर्फीला तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवू शकता. तुमची चवदार गुलाब बर्फी तयार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

SCROLL FOR NEXT