Restaurant In Goa: विवा पणजी सौंदर्य आणि स्वाद  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Restaurant In Goa: विवा पणजी सौंदर्य आणि स्वाद

परदेशी पाहुण्यांना मसालेदार पदार्थ चालत नाही तर देशी पाहुणे खमंग पदार्थांची अपेक्षा करतात. या दोन्हीचा तोल ‘विवा-पणजी’ ने आतापर्यंत सांभाळला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजीच्या फोन्ताईन्यस (मळा) भागात, एका गल्लीत शांत विसावून असलेल्या ‘विवा पंजीम’ या रेस्टॉरंटमध्ये अस्सल गोवा-पोर्तुगीज स्वादाचा वारसा अजूनही उत्तम तऱ्हेने जोपासला जातो आहे. पोर्तुगीज शैलीच्या एका टुमदार घरात सुमारे 15 वर्षांपूर्वी मायकल डिसौझा आणि लिंडा डिसौझा दाम्पत्याने हे रेस्टॉरंट सुरू केलं. या रेस्टॉरंटच्या बाहेरच्या बाजूचा, टेबलवर बसलेल्या पाहुण्यांच्या सोबतचा ‘क्लोजप देखावा’ अगदी युरोपियन वाटतो आणि आतला पोर्तुगीज अवकाश आपल्याला रम्यपणे मोहवून टाकतो. हे रेस्टॉरंट सुरू झाल्यापासून आपल्या पाहुण्यांचे आतिथ्य कसे करायचे याचे भान लिंडाने ठेवले आहेच. परदेशी पाहुण्यांना मसालेदार पदार्थ चालत नाही तर देशी पाहुणे खमंग पदार्थांची अपेक्षा करतात. या दोन्हीचा तोल ‘विवा-पणजी’ ने आतापर्यंत सांभाळला आहे. तिथे कुठलाही पदार्थ आधी तयार करून ठेवला जात नाही. ‘वीस मिनिटे वाट पहा. ही रेस्टॉरंटची प्रथम विनंती असते आणि नंतर टेबलवर येते ते ‘स्ट्रेट फ्रॉम दी पॅन’ असते, लिंडा सांगत होती. त्यांचे गोवन-पोर्तुगीज पद्धतीचे शिजवणेदेखील लोकांना आवडते.

या रेस्टॉरंटमध्ये देशी पर्यटकांबरोबर परदेशी पर्यटकांचाही राबता अखंड चालू असतो. हल्लीच ह्या रेस्टॉरंटचे ‘रिस्टोरेशन’ झाले आहे. हे रेस्टॉरंट लिंडा डिसौझा आपल्या मुलीबरोबर, शर्मिला फर्नांडिस हिच्याबरोबर, मिळून चालवतात. या रेस्टॉरंटचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार प्रथम शर्मिलाच्या मनात आला. जागेचे पोर्तुगीजकालीन रूप तसेच ठेवायचे हे मात्र निश्चित होते. तशातच लिंडा आणि शर्मिला यांची हल्लीच पोर्तुगालला वारी घडली. या वारीत त्यांनी तिथल्या अनेक रेस्टॉरंटना भेटी दिल्या. आपल्या इवल्याशा जागेत काय नेमके बदल घडवून आणता येईल याचा विचार आणि अभ्यास त्यादरम्यानच झाला.

पायऱ्यांवर आणि फरशांवर ‘आझुलेजोश’ वाटतील अशा शैलीच्या टाईल्स तिने बसवल्या आहेत. वरच्या मजल्यावर टेबलेही अगदी स्टार हॉटेलच्या तोडीची आहेत. वाॅशरुमचा विचार करतांना ही त्यात युरोपियन सुरेखपणा आणला आहे. ‘विवा-पणजी’ पूर्वीसुद्धा गोव्याचे एक ‘लिटल ब्युटी’ होते. त्याच्या ‘ब्युटी’त आता भर पडून ते आता यौवनात शिरले आहे असे नक्कीच म्हणता येईल. अर्थात हे यौवन तिथल्या ‘मेनू’ला अधिक कसोशीने सांभाळेल यात दुमत नाही. लिंडाची मुलगी आणि पार्टनर शर्मिला याबाबतीत ठाम आहे. लिंडा म्हणते, ‘शर्मिला इज अ मार्केटिंग गर्ल’. शर्मिला परदेशी राहून आलेली आहे त्यामुळे तिला आपल्या या लहानशा जागेचा आंतरराष्ट्रीय दर्जा कसा सांभाळायचा याचे ज्ञान नक्कीच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT