निरोगी आरोग्यासाठी फॉलो करा या Healthy Habits

निरोगी आरोग्य राखण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे.
निरोगी आरोग्यासाठी फॉलो करा या Healthy Habits
निरोगी आरोग्यासाठी फॉलो करा या Healthy Habits Dainik Gomantak
Published on
Updated on

आजकालच्या धावपळीच्या जीवनमानात निरोगी आरोग्य (Healthy) राखण्यासाठी सकस (Healthy Food) आहारासोबतच व्यायाम आणि चांगल्या सवयी असणे आवश्यक आहे. चांगल्या सवयीमुळे (Good Habits) आपण अनेक आजरांपासून दूर राहू शकतो. कोणत्या आहेत या चांगल्या सवयी जाणून घेवूया.

* व्यायाम

नियमितपणे व्यायाम केल्याने आरोग्य निरोगी राहते. आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी व्यायाम करणे देखील फायदेशीर आहे.

* स्वादिष्ट नाश्ता

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी नाश्ता करणे बंद करतात. पण नाश्ता न केल्याने अधिक भूक लागून आपण गरजेपेक्षा अधिक खातो.

* हायड्रेट

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीरातील योग्य कार्यासाठी, शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी, संक्रमण टाळण्यासाठी हायड्रेशन खूप महत्वाचे आहे.

* दिवसभरातील कामाची यादी करणे

दिवसभरात किती कामे आणि कोणती कामे करायची आहेत याची जर यादी तयार असेल तर आपल्यावर ताण येणार नाही.

* निरोगी पेय

निरोगी आरोग्यासाठी आपण ग्रीन टी चे सेवन करू शकतो. यात अँटीऑक्सिडंट्स चे प्रमाण भरपूर असते. यामुळे तणाव कमी होतो.

निरोगी आरोग्यासाठी फॉलो करा या Healthy Habits
RO Water: स्वयंपाकातील आरओचे पाणी ठरत आरोग्यासाठी घातक

* लवकर उठणे

सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी लाभदायी असते. सकाळी उठून ध्यान किंवा व्यायाम केल्याने आरोग्य दिवसभर फ्रेश वाटते. सकाळी लवकर उठणे ही एक चांगली सवय आहे.

* सक्रिय राहा

सक्रिय राहण्यासाठी ऑफिसमध्ये लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर करावा. वीकेडला तुम्ही तुमच्या मित्रासोबत ट्रेकिंगसाठी जाऊ शकता.

* घराचे जेवण

घरी बनवलेले जेवण आरोग्यासाठी उत्तम असते. यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. यामुळे कॅलरीज किंवा प्रथिनांचे प्रमाण नियंत्रित करू शकता.

* चांगली झोप

निरोगी आरोग्यासाठी 7 ते 8 तासाची झोप पुरेशी ठरते. झोप जर चांगली झाली असेल तर दिवसभर आपल्याला फ्रेश वाटते. तुम्ही जर रात्री बराच वेळ जागी राहत असाल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com