Republic Day Special Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Republic Day Special Recipe: प्रजासत्ताक दिनानिमित्त दुधापासून तयार करा 'हे' स्वादिष्ट पदार्थ

बाजारातून मिळणाऱ्या मिठाई आरोग्यासाठी जास्त हानिकारक असतात आणि त्यांची शेल्फ लाइफ खूपच कमी असते. यामुळेच मिठाईचा योग्य वेळी वापर केला नाही तर त्याही आंबट होतात. यामुळे 26 जानेवारीनिमित्ताने घरीच दूधापासून पुढील स्वादिष्ट पदार्थ बनवा

Puja Bonkile

दूध पिणे निरोगी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दूधात अनेक पोषक घटक असतात. पण तुमची मुल दूध पीत नसतील तर 26 जानेवारीनिमित्त दुधापासून काही स्वादिष्ट गोड पदार्थ बनवू शकता. बाजारातून मिळणाऱ्या मिठाई आरोग्यासाठी जास्त हानिकारक असतात आणि त्यांची शेल्फ लाइफ खूपच कमी असते. यामुळेच मिठाईचा योग्य वेळी वापर केला नाही तर त्याही आंबट होतात. यामुळे 26 जानेवारीनिमित्ताने घरीच दूधापासून पुढील स्वादिष्ट पदार्थ बनवा.

संत्रा बर्फी

साहित्य

संत्री - 4

दूध - 1 कप

दूध पावडर - 1 वाटी

साखर - 1 वाटी

नारळ - 1 वाटी (किसलेले)

तूप - 2 चमचे

बदाम - बारिक तुकडे

काजू - बारिक तुकडे

पिस्ता - बारिक तुकडे

ऑरेंज फूड कलर - 1 टीस्पून

कृती

सर्वात पहिले संत्रा सोलून मग बिया काढून घ्या. बिया काढून दुसऱ्या भांड्यात ठेवा. तसेच, वर नमूद केलेले सर्व साहित्य तयार ठेवा.

या दरम्यान, एका भांड्यात दूध घाला आणि ते मोठ्या आचेवर उकळवा आणि जेव्हा ते उकळते तेव्हा गॅस कमी करा. नंतर दुधात मिल्क पावडर आणि साखर घालून शिजवा.

सतत ढवळत राहा आणि थोडे घट्ट होऊ द्या. आता संत्री मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून बारीक करून घ्या. संत्री बारीक झाल्यावर मिक्सर ग्राइंडरमध्ये थोडे थोडे टाकून बारीक करा.

संत्री घातल्यानंतर आच थोडी वाढवा. नंतर चिरलेला मावा घाला आणि शेवटी किसलेले खोबरे घाला. तुमची ऑरेंज बर्फी तयार आहे.

तुमच्या बर्फीचा रंग चांगला नसेल तर केशरी रंग वापरा. त्यामुळे बर्फीला चव चांगली येईल.

मखाणा खीर

साहित्य

मखाणा- 1 वाटी

काजु - बारीक चिरलेले

बदाम- बारीक चिरलेले

तुप- 1/2 टि स्पुन

विलायची पावडर- गरजेनुसार

दुध- 3 कप

चवीनुसार साखर

कृती

सर्वात पहिले कढईत थोडे तूप घालून मखना आणि काजू भाजून घ्या आणि नंतर त्यावर थोडेसे खडे मीठ टाकावे.

नंतर ब्लेंडरमध्ये 3/4 मखना आणि थोडी विलायची आणि काजू घालून बारीक करा.

नंतर एका पॅनमध्ये 2 ते 3 कप दूध घालून उकळू द्या.

त्यात साखर घाला, नंतर त्यात मखणाचे मिश्रण घाला आणि चांगले मिक्स करा.

आता उरलेला भाजलेला मखना आणि काजू घाला.

ते घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहा

बारिक चिरलेल्या ड्रायफ्रुट्सने सजवल्यानंतर तुम्ही खीर गरम किंवा थंड सर्व्ह करू शकता.

मटार खीर

साहित्य

वाटाणे - अर्धा कप (उकडलेले)

दूध - 5 कप

पाणी - 2 कप

तूप - १ वाटी

सुका मेवा - अर्धा कप

साखर - २ कप

विलायची पावडर- अर्धी वाटी

कृती

मटार खीर बनवण्यासाठी वर नमूद केलेले सर्व साहित्य तयार करा. तसेच हिरवे वाटाणे उकळायला ठेवा आणि मावा चिरून घ्या.

यावेळी भांड्यात २ कप पाणी उकळण्यासाठी ठेवा. सुमारे एक तास उकळल्यानंतर पाण्यात दूध घाला.

नंतर सर्व पाणी आटेपर्यंत दूध हळूहळू शिजवा.

पाणी पूर्णपणे आटल्यावर त्यात हिरवे वाटाणे टाकून शिजवा. वाटाणे शिजल्यानंतर त्यात साखर घाला.

घट्ट झाल्यावर सर्व मावा घाला आणि नंतर थंड करण्यासाठी ठेवा.

नंतर त्यात पिस्ता घालून सर्व्ह करता येते.

आता वर नमूद केलेल्या तीन पदार्थांना तिरंग्याच्या रंगात सजवा आणि प्रजासत्ताक दिनाचा आनंद घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT