Remedies For Sore Throat Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Remedies For Sore Throat In Monsoon: पावसाळ्यात घशाच्या आजाराने बेजार? अशी करा सुटका

Remedies For Sore Throat: त्रिफळा चूर्ण घशातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकते.

दैनिक गोमन्तक

Remedies For Sore Throat In Monsoon: पावसाळा सुरु झाला की अनेक आजारांना देखील आपोआप निमंत्रण मिळते. त्यामध्ये सर्दी , खोकला यासारख्या आजारांचा समावेश होतो.

वातावरणातील बदल, खराब पाणी, थंडी, आर्द्रता इत्यादींमुळे पावसाळ्यात घसा खवखवण्याची शक्यताही वाढते.

या आजारांमध्ये घसेदुखीचा त्रासदेखील सहन करावा लागतो. आता यापासून आराम मिळवण्यासाठी आपण असे अनेक घरगुती उपाय करु शकतो ज्यामुळे घसा खवखवण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

आज आपण अशा काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊयात त्‍याच्‍या मदतीने घसादुखीपासून झटपट आराम मिळू शकतो.

  • गुळण्या करणे

हा आपल्या घरात पूर्वीपासून माहित असलेला उपाय आहे. घशातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

यासाठी कोमट पाण्यात मीठ मिसळा. या पाण्याच्या तुम्ही गुळण्या करु शकता.

  • तुळशीचा काढा

तुळशीच्या पानांपासून बनवलेला काश प्यायल्याने घशाला आराम मिळतो.

तुळशीच्या पाण्यात थोडेसे मध आणि लिंबाचा रस मिसळून पिणे देखील फायदेशीर ठरू शकते.

  • हळदीचा काढा

हळदीला आयुर्वेदात विशेष स्थान आहे. आपल्या आरोग्यासाठी हळद अत्यंत उपयुक्त मानली जाते.

घशाच्या दुखण्यापासून सुटका मिळण्यासाठी हळद अत्यंत उपयुक्त पडते. कोमट पाण्यात हळद पावडर मिसळून तुम्ही पिऊ शकता. याशिवाय गरम दूधात हळद मिसळून ते पिऊ शकता.

  • लिकोरिसा

लिकोरिसच्या मुळांचा रस घशात पिळून प्यायल्याने घसादुखीमध्ये आराम मिळतो. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही पिऊ शकता.

  • त्रिफळा पावडर

त्रिफळा चूर्ण घशातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT