Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणं योग्य की अयोग्य? प्रेमानंद महाराजांनी तरूणांना दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

Premanand Maharaj Tips: प्रेमानंद जी महाराज केवळ भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत.

Sameer Amunekar

प्रेमानंद महाराज केवळ भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रवचने आणि विचार अनेक लोकांना प्रभावित करतात. त्यांच्या आध्यात्मिक आणि प्रेरणादायी संदेशांमुळे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

अलीकडेच, प्रेमानंद महाराजांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी तरुण पुरुष आणि महिलांना नातेसंबंधांबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

प्रेमानंद महाराजांनी सांगितले की, "आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. इतर चुकीचे करत असतील, तरी आपण त्यांचे अनुकरण करू नये. जर आपण योग्य मार्ग अनुसरला तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही."

याचा अर्थ असा की, प्रत्येकाने स्वतःला सुधारण्यावर भर द्यावा आणि इतरांच्या चुकीच्या वागणुकीमुळे आपल्या मार्गावर परिणाम होऊ देऊ नये.

प्रेमानंद महाराज स्पष्टपणे सांगतात की, मैत्री करणे चुकीचे नाही, परंतु रिलेशनशिपमध्ये राहणे योग्य नाही. त्यांच्या मते, नातेसंबंध पवित्र असले पाहिजेत, अन्यथा ते व्यक्तीच्या जीवनावर आणि समाजावर नकारात्मक परिणाम करू शकतात.

भारतात नैतिकता आणि पवित्रतेला मोठे महत्त्व आहे. मुलीचे लग्न होईपर्यंत तिने कोणत्याही पुरुषाशी असलेले नाते मर्यादित ठेवावे. जर कुणी केवळ निस्वार्थ भावनेने मैत्री करत असेल तर त्यात काही चुकीचे नाही.

पण जर मैत्रीच्या नावाखाली भौतिक किंवा शारीरिक आकर्षण वाढत असेल, तर ते समाज आणि व्यक्तीच्या भविष्यासाठी घातक आहे. असे नातेसंबंध ठेवणारे लोक भविष्यात कधीही आनंदी राहत नाहीत, त्यांना निश्चितच काही ना काही समस्या भेडसावत असते.

आजच्या आधुनिक युगात नातेसंबंध आणि मैत्रीबाबत अनेक संकल्पना बदलत आहेत. अशा वेळी प्रेमानंद महाराजांचा हा सल्ला तरुणांना योग्य दिशा दाखवू शकतो.

त्यांच्या मते, सुसंस्कारित आणि नैतिकतेने परिपूर्ण जीवन हेच खरे सुख देणारे असते. समाजातील तरुणांनी विचारपूर्वक आणि जबाबदारीने आपले निर्णय घेण गरजेचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live Updates: उबरसारख्या कॅब अ‍ॅग्रीगेटर्सना कोणतीही मान्यता देण्यात आलेली नाही - मुख्यमंत्री

Coconut: ..रावणाने भगवान शिवास आपली 10 शिरकमले अर्पण करण्यास प्रारंभ केला! समर्पणाचे प्रतीक 'नारळ'

Goa Assembly: ‘मोफा’ धर्तीवर सदनिकांचा प्रश्न सोडवणार! प्रसंगी वटहुकूमही जारी करू; मुख्यमंत्र्यांची हमी

Dovorlim Road: रस्ते दुरुस्त करा! दवर्लीत ‘आप’ची निदर्शने; आठवड्यात दुरुस्ती करण्याची मागणी

Cricketer Arrested: इंग्लंड दौऱ्यावर युवतीवर अत्याचार, स्टार खेळाडूला अटक; बोर्डाकडून तत्काळ निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT