Goa Drug Crackdown: ड्रग्ज तस्करीवर गोवा पोलिसांची करडी नजर; किनारी भागात तपासणी तीव्र

Drug Inspections: पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाकडून किनारी भागात अमलीपदार्थविरोधी तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.
Drug inspection Goa
Drug inspection GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाकडून किनारी भागात अमलीपदार्थविरोधी तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. आता अचानक आणि अनियमित तपासण्या सुरू केल्या आहेत, अशी माहिती विभागाचे प्रमुख अधीक्षक टिकमसिंह वर्मा यांनी दिली आहे.

राज्यातील अमलीपदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी सतत प्रयत्न करणारा अमली पदार्थविरोधी विभाग आता केवळ नियमित छापासत्र राबवून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करत नाही. आता किनारी भागातील आस्थापनांमध्ये तसेच प्रमुख वाहतूक केंद्रांवर (रेल्वे स्थानक, बस स्थानक इत्यादी) अचानक आणि अनियमित तपासण्या करत आहे.

Drug inspection Goa
Goa Drugs Case: म्हापसा पोलिसांची छापेमारी! 3 लाखांच्या गांजासह दोघेजण अटकेत; जानेवारी महिन्यात 13.69 लाखांचा अंमली पदार्थ जप्त

यामध्ये आंतरराज्य बस आणि गाड्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे; कारण याच मार्गांचा वापर करून मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ राज्यात आणले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Drug inspection Goa
Gujarat Drugs Case: गुजरातमध्ये जहाजातून तब्बल ५०० किलो अमली पदार्थ जप्त, NCB- नौदलाची मोठी कारवाई

या तपासण्यांमध्ये पोलिसांच्या अमलीपदार्थ शोधक कुत्र्यांसह तपासणी केली जात आहे. याशिवाय, आता केवळ अमली पदार्थ विक्रेते आणि पुरवठादारांवरच नव्हे, तर संशयित ग्राहकांवरही कडक नजर ठेवली जात आहे. या अनियमित तपासण्या अशाच प्रकारे सुरू राहतील, असेही वर्मा यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com