Pre-Marriage Medical Test 
लाइफस्टाइल

Pre-Marriage Medical Test : मंडळी! लग्नाआधी या 'मेडिकल चाचण्या' आहेत महत्वाच्या; एकदा सविस्तर वाचा

Pre-Marriage Medical Test : तुम्हीही लग्नाची तयारी करत असाल तर येथे नमूद केलेल्या वैद्यकीय चाचण्या जरूर करा.

दैनिक गोमन्तक

Pre Marriage Medical Test : भारतीय कुटुंबांमध्ये विवाहाची परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते. आपले वैवाहिक जीवन आनंदाने जावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हीही लग्नाची तयारी करत असाल तर येथे नमूद केलेल्या वैद्यकीय चाचण्या जरूर करा.

यामुळे लग्नानंतर कोणत्याही प्रकारची वैद्यकीय समस्या येण्याची शक्यता कमी होईल आणि तुम्ही तुमच्या मुलांना अनुवांशिक आजारांपासूनही वाचवू शकता. (Pre Marriage Medical Test)

लग्नापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

प्रजनन चाचणी

ज्या पद्धतीने लोक लग्नापूर्वी मुला-मुलींच्या कुंडली जुळवतात आणि त्यांचे शिक्षण तपासतात. त्याचप्रमाणे त्यांची वैद्यकीय चाचणीही झाली पाहिजे. प्रजनन चाचणी करून हे कळते की जोडप्यातील कोणत्याही व्यक्तीला भविष्यात मूल होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. काही समस्या असल्यास त्यावर उपचार करता येतात.

अनुवांशिक वैद्यकीय इतिहास

सध्याच्या युगात मधुमेह किंवा हृदयविकार खूप सामान्य झाले आहेत. त्यामुळे या जोडप्याला एकमेकांचा कौटुंबिक वैद्यकीय इतिहास माहीत असेल तर ते चांगले आहे आणि भविष्यात या आजारांवर उपचार करता येतील.

Pre-Marriage Medical Test
  • थॅलेसेमिया चाचणी

विवाहापूर्वी जोडप्याने थॅलेसेमियाची चाचणी करणे आवश्यक आहे कारण यामुळे मुलांमध्ये जन्मजात दोष निर्माण होतात. त्यामुळे जोडप्यांनी लग्नापूर्वी त्याची चाचणी करून घेतली पाहिजे.

  • मानसिक आरोग्य स्थिती

लग्नापूर्वी जोडप्याच्या मानसिक आरोग्याची स्थिती तपासली पाहिजे. दोघांपैकी कुणालाही काही मानसिक आजार आहे की नाही हे त्यावरून कळेल. यामुळे वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येत नाही.

  • एचआयव्ही आणि एसटीडी चाचणी

ही सर्वात महत्वाची चाचणी आहे, कोणत्याही व्यक्तीने लग्नापूर्वी एचआयव्ही आणि एसटीडी चाचणी करणे आवश्यक आहे. सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही लग्नाची तयारी करत असाल तर नक्कीच ही टेस्ट करून घ्या.

  • या चाचण्याही महत्त्वाच्या आहेत

वर नमूद केलेल्या चाचण्यांव्यतिरिक्त रक्तगट चाचणी, जीनोटाइप चाचणी आणि पेल्विक अल्ट्रासाऊंड चाचणी करणे आवश्यक आहे. पेल्विक अल्ट्रासाऊंड चाचणी ही एक महत्त्वाची चाचणी आहे जी गर्भाशय, अंडाशय आणि फॅलोपियन ट्यूबची स्थिती दर्शवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT