Heart Attack: 'या' होणाऱ्या वेदना म्हणजे हृदयविकार नव्हे.. वाचा सविस्तर

आयुर्वेददृष्ट्या विचार केला असता वैद्य मंडळी असं सांगतात कि, ठराविक गोष्टी घडल्या तर छातीत दुखू शकते.
Heart Attack
Heart AttackDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वसाधारणपणे छातीमध्ये वेदना व्हायला लागल्या की हृदयविकाराचा झटका येतो अशी समजूतच रूढ झालेली आहे. विशेषतः रात्रीच्यावेळी असं दुखणं उद्भवलं की हृदयविकाराच्या भीतीने व्यक्ती अधिकच अवसान गळून बसते. पण आयुर्वेददृष्ट्या विचार केला असता वैद्य मंडळी असं सांगतात कि छाती दुखणे म्हणजे हृदयविकारच होणे असे समजण्याचे काही कारण नाही तर इतरही कारणाने छातीत दुखू शकते.

सर्वसामान्यपणे छातीत दुखण्याची कारणे पुढीलप्रमाणे असतील :-

पित्त वाढल्याने- पित्त वाढल्याने सुध्दा छाती दुखते. परंतु ही छाती दुखणे म्हणजे वेदना नसतात. तर छातीत जळजळ होऊ लागते. पोटातील आम्ल उलट्या दिशेने वर सरकायला लागते आणि ते छातीपर्यंत येऊन छातीत जळजळ व्हायला लागते. अशा वेळी छातीत होणाऱ्या वेदना म्हणजे हृदयविकार नव्हे.

क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलणे- आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न केला तरीही छातीत वेदना होतात. या वेदना स्नायूला होत असतात. कारण वजन उचलण्याचा ताण स्नायूवर आलेला असतो. हृदयाची इतर दुखणी होतात तेव्हाही छाती दुखू शकते.

Heart Attack
Matured Life Partner: मॅच्युअर पार्टनर असल्याचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

न्युमोनिया झाला असेल तर- न्युमोनिया झाल्यानंतरसुध्दा छातीत वेदना होऊ शकतात. हा विकार सर्दीबरोबरच यकृतात जंतू संसर्ग झाल्यामुळे होतो आणि त्यामुळे छातीत वेदना होऊ शकतात. न्युमोनियामध्ये कफ, ताप आणि खोकला एकदम होतो आणि छाती दुखते .

हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा होणाऱ्या छातीतल्या वेदना वेगळ्या असतात. अशावेळी छातीत वरवर दुखत नाही तर आतून प्रचंड वेदना होतात. त्या वेदनांचा त्रास घसा, हाताचे दंड आणि एवढेचे नव्हे तर जबड्यांनाही होतो. अशावेळी काळजी घेउन लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com