Relationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: आयुष्यात 'या' 5 प्रकारच्या लोकांना कधीही म्हणू नका अलविदा

Relationship Tips: तुमच्या आयुष्यात या पाच प्रकारचे लोक असतील तर तुम्ही त्यांना गमवु नका.

Puja Bonkile

Relationship Tips: सोशल मिडियावर ओळख होणे काही मोठी गोष्ट नाही. फेसबुकपासून ते इंस्टाग्रामपर्यंत लोकांचे अनेक मित्र आहेत. मोबाइलमध्ये हजारो नंबर असतात तरीसुद्धा लोकांना एकटेपणा जाणवतो.

खरं तर अनेक लोकांकडे जवळचे असे कोणीच नसते की ज्याच्याशी ते सर्व गोष्टी शेअर करतील. पण हे एकटेपण नेहमी असेलच असे नाही, कधी कधी आपल्या चांगल्या काळात आपण चांगल्या लोकांना विसरून जातो.

प्रत्येक परिस्थितीत साथ देणारे

असे म्हणतात की केवळ वाईट काळातच चांगल्या आणि वाईट लोकांची ओळख होते. अशा वेळी ज्यांनी तुम्हाला वाईट काळात तुम्हाला मदत केली आहे अशा लोकांना तुमची चांगली वेळ आल्यावर विसरू नका. कारण हेच लोक तुमची खरी ताकद असतात.

प्रोत्साहन देणारे

असे अनेक वेळा घडते की आपण आपल्या स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ लागतो. अशावेळी आपल्यावर विश्वास दाखवणाऱ्या व्यक्तीची आपल्याला गरज असते. असे मानले जाते की असे लोक नशीबवाल्यांनाच मिळतात. यामुळे जर तुमच्याकडे असा व्यक्ती असेल तर गमावू नका.

चूक सांगणारे

प्रत्येकाला फक्त स्वत:चे कौतुक ऐकायचे असते. जर कोणी चूक दाखवली तर त्यांना वाईट वाटते. पण प्रत्यक्षात अशा लोकांना तुमच्यापासून दूर होऊ देऊ नका. इतरांप्रमाणे ते गोड बोलून तुम्हाला आनंदी ठेवत नाही तर प्रामाणिकपणे चुका सांगुण तुम्हाला सुधारण्यास मदत करतात.

तुमच्या यशात आनंदी होणारे

एकमेकांना मागे ओढून पुढे जाणारे अनेक लोक आहेत. पण तुमच्या यशाचा आनंद स्वतःचा विजय म्हणून साजरा करणारी अशी माणसे फारच कमी आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे असे कोणी असेल तर त्याला कधीही दूर करू नका.

समजून घेणारे

जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला समजुण घेणारे लोक असतील अशा लोकांशी दुरावा येऊ देऊ नका. कारण असे लोक फार कमी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT