Relationship  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Strengthen Tips: प्रेम असूनही का रे दुरावा? नात्यात 'या' गोष्टी आवश्यकच

दैनिक गोमन्तक

Relation Tips: अपर्णा तिच्या समुपदेशक मैत्रिणबरोबर म्हणजेच निशीसोबत गप्पा मारत होती. बोलता बोलता अपर्णा म्हणाली निशी माझं आणि ऋषी ( अपर्णाचा जोडीदार )चं नातं पूर्वीसारखं वाटत नाही. काहीतरी तुटलेपण सतत जाणवत राहतं.

प्रेम अजूनही आहे पण काहीतरी हरवलं आहे हे नक्की. अनेकदा त्याच्या आयुष्यात काय चालले आहे हे त्याला आणि मला कोणत्या समस्या आहेत हे त्याला कदाचित माहीत होत नाही. एकमेकांप्रति प्रेम वाटूनही काय चुकत असेल बरं ?

यावर निशीने थोडावेळ विचार केला. तिला आठवले गेल्या काही दिवसात अशी कितीतरी जोडपी तिच्याकडे आपल्या नात्यातील अशाच समस्या घेऊनच आली होती. त्यांचेही हेच म्हणणे होते की, आम्हाला एकमेकांप्रति प्रेम वाटते पण काहीतरी असे आहे ज्यामुळे आमच्यात दुरावा आला आहे. अपर्णा जास्त वेगळं काही सांगत नव्हती.

निशीने अपर्णाला जो सल्ला दिला तो अनेकदा आपल्या नात्यातही उपयोगी पडू शकतो. आपली नाती मजबूत करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. त्या गोष्टी कोणत्या हे पाहुयात. चला तर जाणून घेऊयात निशीने अपर्णाला कोणत्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत.

१. संवाद साधावा

अनेकदा आपल्या जोडीदाराप्रति अफाट प्रेम वाटत असते. परंतु संवादाचा अभावामुळे हे प्रेम जोडीदारापर्यंत पोहचत नाही.

समोरचादेखील तसेच वागत असेल तर तुम्हाला एकमेकांप्रति काय वाटते हे व्यक्त झाल्याशिवाय समजू शकत नाही. त्यामुळे तुमच्यात जर संवाद होत नसेल तर तुमच्यातील प्रेमदेखील संपण्याची शक्यता असते. कारण संवाद तुमचे नाते जिवंत ठेवते. जोडीदाराबरोबरच्या नात्यातच नाही तर आपल्या इतर नात्यातही हा संवाद महत्वाचा असतो.

आपल्याला काय वाटते, तुम्ही काय विचार करत आहात हे समोरच्याला समजावून सांगणे महत्वाचे ठरते. त्यामुळे नात्यात कोणतीही समस्या वाटत असेल तर तर जोडीदाराबरोबर मोकळेपणाने संवाद साधा. कोणत्याही नात्यात व्यक्त होणे महत्वाचे ठरते.

२. विश्वास

कोणतेही नाते विश्वासाच्या आधारावर बनलेले असते. त्यामुळे नात्यातील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी जोडीदाराबरोबर शेअर करणे महत्वाचे ठरते. गोष्टी लपवू नका, मोकळेपणाने सांगा.

३. वेळ

नात्यातील ओलावा जपण्यासाठी एकमेंकासोबत क्वालिटी टाइम घालवणे महत्वाचे ठरते. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे, एकमेकांना वेळ देणे महत्वाचे आहे. कारण आजकाल आयुष्य इतके व्यस्त झाले आहे की आपण आपल्या माणसांना वेळ द्यायचे विसरुन जातो. त्यामुळे तुमचे नाते तुमच्यासाठी महत्वाचे असेल तर तुमच्या व्यग्र दैनंदीन आय़ुष्यातील काही वेळ आपल्या माणसांसाठी राखीव ठेऊनच दिवसाच्या कामाची योजना आखली पाहिजे.

४. जाणून घ्या

तुमचा जोडीदार कोणत्या अडचणींना सामोरे तर जात नाही ना हे जाणून घ्या. जोडीदार अडचणीत असेल तरीदेखील तुमच्या नात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अडचण जाणून घेऊन तुम्ही जोडीदाराला हा विश्वास द्या की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही त्याच्याबरोबर आहात. यामुळे तुमचे नाते मजबूत होण्यास मदत होते.

५. मोकळीक द्या

कधी कधी सतत सोबत असणे, सल्ले देणे, आपले मत लादणे यामुळे तुमच्या जोडीदाराची घुसमट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याचा स्पेस देणे महत्वाचे ठरते. त्याला त्याची मोकळीक द्या.

एखाद्या समस्येबद्दल त्याला काय वाटते हे त्याला समजून घेऊ द्या. सतत तुमच्या मतांचा भडीमार करु नका. जर या नात्यात दोघांचेही प्रेम असूनदेखील दोघांचा अवकाश मिळत नसेल, स्वतंत्र स्पेस मिळत नसेल तर तुमचे नाते धोक्यात येऊ शकते.

निशीने अपर्णाला या गोष्टी समजावून सांगितल्या त्या आपल्यापैकी अनेकांना लागू होतात. या छोट्या छोट्या गोष्टी तुमचे नाते मजबूत करण्याचे काम करत असतात. त्यामुळे आपली नाती जपण्यासाठी या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

टीप: लेखातील नावे बदललेली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT