Food For Diabetic Patients: अलिकडे लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मधुमेहाचा आजार असलेल्या रुग्णांना अनेकदा काय खावे आणि काय खाऊ नये याची योग्य माहीती नसल्याने मोठ्या आजाराचा सामना करावा लागतो. आज आपण हे जाणून घेणार आहोत मधुमेह असलेल्या रुग्णांनी कोणत्या प्रकारचे अन्न खाल्ले पाहिजे. त्यांचा आहार कसा असायला हवा.
तज्ञांनी म्हटल्यानुसार, हिरव्या पालेभाज्यांमध्ये आपल्या शरीराला गरजेचे सर्व व्हिटॅमिन्स, मिनरल आणि पोषकद्रव्ये असतात. पालेभाज्यांमधील घटक तुमच्या रक्तातील साखरेवर तितका परिणाम होत नाही. याबरोबरच हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठया प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि स्टार्चचे प्रमाण असते त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णाच्या आहारात हिरव्या पालेभाज्या असणे महत्वाचे असते.
पालकमध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम, फायबर, व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन चे भरपूर प्रमाण असते. कोबी, ब्रोकोली, कोलार्ड ग्रीन( Collard Green), काले ( Kale ) या भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात समावेश करण्याचा सल्ला आरोग्यतज्ञांकडून दिला जातो.
काले या भाजीचा ज्युसदेखील आरोग्यासाठी फायदेशीर असतो. याबरोबरच तुम्ही या भाज्या शिजवून खाऊ शकता, सलाद मध्ये खाऊ शकता तसेच या भाज्यांचे सूपदेखील बनवू शकते. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते.
काय खाऊ नये?
1. जास्त साखरेचे प्रमाण असलेले पदार्थ
2. ट्रान्सफॅट असलेले पदार्थ
3. प्रक्रिया केलेले पदार्थ
4. जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.