Realme C51: रिअलमीने आपला नवा स्मार्टफोन आज 'Realme C51' लाँच केला आहे. हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची सोय असणार आहे. या फोनमध्ये 8 जीबी डायनामिक रॅम आणि 2 टीबी पर्यंत एक्सटर्नल मेमरी सपोर्ट आहे. हा फोन मिंट ग्रीन आणि कार्बन ब्लॅक या दोन रंगांमध्ये खरेदी शकणार आहे.
वैशिष्ट्य कोणते आहेत?
या फोनमध्ये मिनी कॅप्सूल फिचरची सोय देण्यात आली आहे. जे आयफोन१४ प्रो मध्ये दिलेल्या डायनामिक आयलंड फिचरसारखे आहे. यामध्ये चार्जिंग आणि नोटिफिकनची माहिती माहिती मिळते. तसेच यामध्ये अल्ट्रा बूम स्पीकर आणि फास्ट साइड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
किंमत
Realme C51 फोनची किंमत ८,९९९ रूपये आहे. हा फोन सिंगल स्टोरेज प्रकारचा आहे. रिअलमी वेबसाइड आणि फ्लिपकार्डवर हा फोन खरेदी करू शकता.
फिचर कोणते आहेत?
या फोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. टच सॅपलिंग रेट 180Hz आहे. फोनच्या डिस्प्लेची ब्राइटनेस 560 nits आहे. फोनचे पिक्चर रिझोल्युशन 720/ 1600 आहे. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून UNISOC T612 चिपसेट देण्यात आला आहे. फोनला Android 13 बेस्ड Realme UI T Edition देण्यात आले आहे.
तसेच या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मेन कॅमेरा 50MP चा आहे. तर B&W लेन्स देण्यात आली आहे. याशिवाय फ्रंट कॅमेरा 5MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनचे वजन 186 ग्रॅम आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.