'WhatsApp' सिक्योर करण्यासाठी वापर 'या' 4 सेटिंग्स

WhatsApp मध्ये तुम्ही या सेटिंग करून चॅट सिक्योर करू शकता.
WhatsApp
WhatsApp Dainik Gomantak
Published on
Updated on

आजच्या आधुनिक युगात सर्वांकडे स्मार्टफोन्स आहेत. त्यात अनेक अॅपसह व्हॉट्सअॅपचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअॅप हे मॅसेंजिंग अॅप सर्वात लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी नवनवे फिचर लाँच करत असते. यामुळे यूजर्सची प्रायव्हसी देखील सुरक्षित राहते. तुम्ही जर व्हॉट्सअॅपच्या या ४ गोष्टी सेटिंग्जबद्दल माहिती नसेल तर ही बातमी नक्की वाचाच

  • या 4 सेटिंग्ज आहेत जबरदस्त

1) Two -Step Verification

तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी Two -Step Verification हे फिचर लाँच केले आहे. हि सेटिंग ऑन ठेवल्याने तुमचे अकाउंट सुरक्षित राहते. कारण जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप अकाउंट दुसऱ्या डिव्हाइसवर ओपन करता किंवा ठारविक वेळेनंतर वेळेनंतर ओपन करता तेव्हा व्हॉट्सअॅप तुम्हाला तुम्ही सेट केलेला 6 अंकी पिन विचारतो. यामुळे दुसरे कोणी तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट ओपन करू शकत नाही.

यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जावे लागेल. नंतर अकाउंवर क्लिक करावे लागेल. नंतर Two -Step Verification यावर क्लिक करावे लागेल. नंतर तुम्हाला Turn On वर क्लिक करावे लागेल. या नंतर 6 अंकी पिन टाकावा लागणार आहे.

2) App Lock

व्हॉट्सअॅपने चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अॅप लॉक करण्यासाठी एक खास फिचर लाँच केले आहे. हे दान्ही फिचर ऑन ठेवल्यास तुमचे अकाउंट सुरक्षित राहिल. तसेच तुमचा डेटा देखील कोणी पाहू शकणार नाही.

WhatsApp
Vastu Tips: घराची स्वच्छता करताना कोणत्या चुका टाळाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

3) Privacy CheckUp

WhatsApp सेटिंगमध्ये तुम्हाला Privacy CheckUp नावाचा पर्याय मिळेल. यामध्ये तुम्हाला तुमची प्राव्हेसी सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व पर्याय दिसतील. इथून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला ग्रुपमध्ये कोण अॅड करू शकतो , तुमची वैयक्तिक माहिती कोण पाहू शकेल , मॅसेज टाइम यासारख्या गोष्टींचे सेटिंग करता येते.

4) E-mail Verification

लवकरच व्हॉट्सअॅपमध्ये 'ईमेल व्हेरिफिकेशन' फीचरही लाँच केले जाणार आहे . यानंतर, मोबाईल नंबर व्यतिरिक्त, आपण ईमेलद्वारे देखील आपले एकाउंट ओपन करू शकणार आहे. यासाठी प्रथम तुम्हाला तुमचा ईमेल व्हॉट्सअॅपवर अॅड करावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com