Promises To Have Long Lasting Romantic Relationship
व्हॅलेंटाईन वीकचा आज पाचवा दिवस म्हणजे प्रॉमिस डे होय. धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे कपल्सला एकमेकांसोबत हवा तसा वेळ घालवता येत नाही. त्यामुळे अनेकदा नात्यात दुरावायायला वेळ लागत नाही.
यामुळे फेब्रुवारी महिन्यात येणारा व्हॅलेंटाईन वीक कपल्सला त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी देतो. प्रॉमिस डे निमित्त मनापासून सर्व तक्रारी, रुसवे-फुगवे विसरून लोक त्यांच्या नात्यात गोडवा परत आणतात. तुम्हालाही तुमच्या पार्टनरला खास फील करुन द्यायचे असेल आणि आयुष्यभर त्यांच्यासोबत राहायचे असेल, तर या प्रॉमिस डेला तुमच्या पार्टनरला ही 5 वचने नक्की द्या.
जसा स्वभाव तसे स्विकारा
रिलेशनशिपमध्ये अनेकदा असे घडते की पार्टनर आपल्या प्रेमाला खुश ठेवण्यासाठी त्याच्या आवडी-निवडीनुसार वागु लागतो. हे करत असताना तो अनेकदा स्वतःला पूर्णपणे विसरतो. पण या प्रॉमिस डेला तुमच्या पार्टनरला वचन द्या की तुम्ही त्यांच्यावर ते जसे आहेत तसेच प्रेम कराल. त्यांना कोणासाठीही स्वतःला बदलण्याची गरज नाही.
जोडीदाराला वेळ द्या
तुमचे नाते अनेक वर्षं जुने असले तरी प्रेम आणि वेळेचा अभाव प्रत्येक वयात नाते तोडायला काम करते. हे टाळण्यासाठी जोडीदाराला महत्त्व आणि योग्य वेळ देण्याचे वचन स्वतःला द्या.
प्रामाणिक राहा
कोणतेही नाते जास्त काळ तेव्हाच टिकते जेव्हा ते प्रामाणिकतेच्या पायावर उभे असते. या प्रॉमिस डेच्या (Promise Day 2023) दिवशी आपल्या जोडीदाराशी नेहमी एकनिष्ठ राहण्याचे वचन द्यावे.
पार्टनरशी खोटे न बोलण्याचे वचन द्या
खोटे हे सहसा कोणत्याही नात्यात दुरावा आणु शकतो. जर तुम्हालाही तुमच्या पार्टनरपासून गोष्टी लपवण्याची सवय असेल, तर सर्वप्रथम स्वतःला वचन द्या की ही सवय बदलाल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे प्रेम आणि तुमचे नाते नेहमीच घट्ट असावे असे वाटत असेल तर सर्वप्रथम एकमेकांना वचन द्या की तुम्ही कधीही एकमेकांशी खोटे बोलणार नाही.
क्वालिटी टाइम द्या
सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येक व्यक्तीला एकच समस्या असते की त्याचा पार्टनर त्याच्यासोबत क्वालिटी टाइम घालवत नाही. या प्रॉमिस डेला स्वतःला वचन द्या की तुम्ही तुमच्या कामाच्या बिझी शेड्युलमधूल थोडा वेळ काढून तुमच्या पार्टनरसह गप्पा माराल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.