Dengue fever Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Prevention And Control of Dengue: डेंग्यू होऊ नये म्हणून 'ही' काळजी घेणे महत्वाचे

Prevention Of Dengue Fever: म्हणूनच या आजाराचे गांभीर्य समजून घेणे आणि डेंग्यू होण्यापासून टाळणे महत्वाचे आहे.

दैनिक गोमन्तक

Prevention Of Dengue Fever: पावसाळा हा डेंग्यूच्या डासांच्या पैदास होण्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि योग्य काळ असतो. नाले, कारंजे, कुंडी आणि रस्त्यांवर जिथे जिथे पाणी साचते तिछे तिथे डासांची पैदास झालेली दिसून येते.

यातून डेंग्यू होण्याचे प्रमाण वाढते. डेंग्यू झाला आणि योग्य वेळी उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. म्हणूनच या आजाराचे गांभीर्य समजून घेणे आणि डेंग्यू होण्यापासून टाळणे महत्वाचे आहे.

डेंग्यूचा प्रसार एडिस एजप्ती डासांमुळे होतो. हे डास तुम्हाला चावल्यास डेंग्यूचा ताप होऊ शकतो. डेंग्यूच्या अळ्या सामान्यतः स्वच्छ पाण्यात वाढतात. हे डास विशेषत: घरातील कुलरमधूनही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. डासांमुळे डेंग्यूचा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो.

'ही' आहेत डेंग्यूची लक्षणे

इतर अनेक आजारांप्रमाणे डेंग्यूची सुरुवात तापाने होते, विशेषत: रात्रीच्या वेळी ताप वाढतो, तसेच रुग्णाला पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो. तुम्हाला जास्त थकवा जाणवेल आणि उलट्याही सुरू होतील.

जेव्हा तुम्हाला डेंग्यू ताप येतो तेव्हा तुमच्या रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात, त्यामुळे खूप अशक्तपणा येतो. बर्‍याच वेळा रोग वाढतो तेव्हा, आपण पोटात अन्न पचवू शकत नाही. अनेकांच्या नाकातून आणि हिरड्यांमधून रक्तस्रावही सुरू होतो

डेंग्यूचे डास होऊ नयेत म्हणून ही घ्या काळजी

1. डेंग्यूचे डासांची पैदास होऊ नये यासाठी सर्वप्रथम तुम्ही स्वच्छता राखणे महत्वाचे ठरते.

2. घरामध्ये आणि आजूबाजूला जिथे जिथे पाणी साचत असेल तिथले पाणी साफ करा, यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास होणार नाही.

3. घरातील कुलर नियमित साफ करत राहा आणि रोज पाणी बदलत राहा. हवे असल्यास कूलरच्या पाण्यात थोडे रॉकेल टाका. त्यामुळे डासांची पैदास होत नाही

4. तुमच्या सोसायटीत किंवा उद्यानात कारंजे असल्यास त्यात पाणी साचू न देण्याचा प्रयत्न करा किंवा कारज्याचे पाणी जिछे साठते तिथे मासे ठेवू शकता, जे डासांच्या अळ्या खातात.

5. घरामध्ये मच्छर प्रतिबंधक मशीन किंवा अगरबत्ती वापर करु शकता.

6. झोपताना पलंगावर मच्छरदाणी लावा, जेणेकरून तुम्ही स्वत:ला डास चावण्यापासून वाचवू शकता

7. प्रशासनाच्या मदतीने तुमच्या परिसरात फॉगिंग करा

8. घरातील भांडी, जुने टायर, नारळाच्या शेंड्यामध्ये पाणी साचू देऊ नका

9. पूर्ण बाह्याचे आणि लांब पँट असे कपडे परिधान करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT