Pregnant woman died due to electric shock | Mobile Charging Safety Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mobile Tips: मोबाईल चार्जिंगला लावणे गर्भवती महिलेच्या जीवावर बेतले; तुम्हीपण अशी चूक करत नाहीये ना?

विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

Mobile Charging Safety Tips: स्मार्टफोनच्या अपघाताच्या अनेक घटना आजवर आपण पाहिल्या आहेत. अशीच एक घटना ब्राझीलमध्ये घडली आहे ज्यामध्ये एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

ब्राझीलमधील कॅम्पिना ग्रांडे येथे राहणाऱ्या जेनिफर कॅरोलायने नावाच्या 17 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.

स्मार्टफोन चार्जिंगवेळी हा प्रकार घडला असून विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जेनिफर आणि तिचे न जन्मलेले मूलही वाचू शकले नाही.

अशी घडली घटना...

जेनिफरच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, जेनिफर आंघोळ करून आली आणि एक्स्टेंशन बोर्डला जोडून आपला फोन चार्ज करत होती. मात्र अचानक तिला विजेचा झटका लागला आणि तिचा मृत्यू झाला.

तिचा नवरा धावत तिच्याजवळ आला, पण तोवर तिचा श्वास थांबला होता. जेव्हा मोबाईल इमर्जन्सी केअर सर्व्हिस (एसएएमयू) टीम तिच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. (Pregnant woman died due to electric shock )

स्मार्टफोन आपल्या सर्वांच्या आयुष्यात इतका महत्त्वाचा झाला आहे की बाथरूममध्येही फोन सोबत न्यायची आपल्यापैकी अनेकांना सवय असते. पण ते किती धोकादायक आहे याचा अंदाज वरील घटनेवरून लावता येऊ शकतो.

अशा परिस्थितीत काही गोष्टी पाळणे अत्यंत आवश्यक आहे. आपण कधीही ओल्या हातांनी कोणत्याही इलेक्ट्रिकल उपकरणाला कधीही स्पर्श करू नये.

जशी आपल्याला विश्रांतीची गरज असते तशीच स्मार्टफोनलाही विश्रांतीची गरज असते. अशा स्थितीत सतत फोन वापरू नये. विशेषतः ओल्या हातांनी अजिबात कोणतेही उपकरण हाताळू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT