Pitru Paksha 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pitru Paksha 2022 : पितृपक्षात चुकूनही 'या' गोष्टी करणे टाळा, होऊ शकतो अनर्थ

पितृपक्ष पंधरवडा हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो.

दैनिक गोमन्तक

हिंदू धर्मात पितृपक्षाला खास महत्त्व आहे. पितृपक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. असे मानले जाते की, पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृपक्षात (Pitru Paksha 2022) पिंड दान आणि श्राद्ध हे पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जातात. हे केल्यानं पूर्वज प्रसन्न होतात. आपल्या वंशजांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात.

पितृपक्ष पंधरवडा हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. पुढे तो 15 दिवस चालतो. या दिवसात काही गोष्टी करने या गोष्टी केल्याने पूर्वज नाराज होऊ शकतात. जाणून घेऊया पितृ पक्षात कोणती कामे करू करणे टाळायला पाहिजे.

पितृपक्षात 'या' 5 गोष्टी करणे टाळा

* पितृपक्षामध्ये 15 दिवस घरात सात्विक वातावरण असावे. या काळात घरात मांसाहार बनवू नये. शक्य असल्यास या दिवसात लसूण आणि कांदा देखील खाऊ नये.

* पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने 15 दिवस केस आणि नखे कापू नयेत. यासोबतच या लोकांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे.

* असे मानले जाते की पितृ पक्षाच्या काळात पूर्वज पक्ष्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात. त्यामुळे या काळात पक्ष्यांना त्रास देऊ नये. पितृपक्षात पशु-पक्ष्यांची सेवा करावी.

* पितृपक्षाच्या काळात केवळ मांसाहारच नव्हे तर काही शाकाहारी पदार्थ खाणे देखील टाळावे. या दिवसात काकडी, हरभरा, जिरे आणि मोहरी, हिरव्या भाज्या खाऊ नयेत.

* पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करू नये. पितृ पक्षात लग्न, साखरपुडा आणि गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य करु नयेत. पितृपक्षात शोकाचे वातावरण असते, त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT