कर्करोग हा जगातील कॉमन आजारांपैकी एक आहे. विशेषतः भारतात हा एक अतिशय सक्रिय आजार मानला जातो. कर्करोग अनेक प्रकारचा असू शकतो जसे की स्तनाचा, फुफ्फुसाचा किंवा तोंडाचा कर्करोग इत्यादी... यापैकी तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत गेल्या काही वर्षात कमालीची वाढ झाली आहे. कारण आपल्या देशात तंबाखू आणि गुटखा सारख्या पदार्थांचे जास्तप्रमाणात सेवन केले जाते. तथापि, हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे की तोंडाचा कर्करोग केवळ या कारणांमुळे होत नाही. तोंडाच्या आत झालेल्या जखमा किंवा अल्सर देखील तोंडाच्या कर्करोगाचे कारण ठरु शकतात. चला तर मग याविषयी तज्ञांकडून जाणून घेऊया.
रांचीच्या दंत संस्थेच्या ओरल मेडिसिन आणि रेडिओलॉजी विभागाच्या एमडीएस विभागातील तज्ज्ञ डॉ. सुगंधा वर्मा सांगतात की, बऱ्याचदा लोकांच्या तोंडात गंभीर अल्सर होतात, जे जोरात ब्रशिंग केल्याने होतात. मात्र तोंडातील हे फोड बरेच दिवस बरे नाहीत झाले तर ते तोंडाच्या कर्करोगाचे (Cancer) कारण ठरु शकतात.
तज्ज्ञांच्या मते, काही तोंडाचे अल्सर खाण्यापिण्यामुळे किंवा पिण्यामुळे होत नाहीत तर तीक्ष्ण वस्तूंमुळे होतात. तीक्ष्ण वस्तुंमुळे झालेल्या जखमाही या आजाराचे कारण ठरतात. जर या जखमा वेळीच बऱ्या झाल्या नाहीत तर हा कर्करोग होऊ शकतो. तसेच, जर एकदा जखम झाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी नवीन जखम होत असेल, तर हे अजिबात चांगले लक्षण नाही. हे सुद्धा तोंडाच्या कर्करोगाचे कारण ठरु शकते.
सामान्यतः तोंडाचा अल्सर स्वतःहून बरा होतो आणि तो फार धोकादायक नसतो. परंतु काही प्रकरणांमध्ये तो गंभीर असू शकतो, जसे की अल्सरचा आकार वाढणे, त्यातून रक्त येणे, तीव्र सूज येणे आणि 1 महिन्यातही बरी न होणे. तज्ञांचे मते, याला कॉमन डेंटल प्रॉब्लेम मानणे योग्य ठरत नाही. त्यामुळे हा कर्करोग आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
जरी तोंडाच्या कर्करोगाचे सर्वात कॉमन लक्षण म्हणजे अल्सर किंवा जखम असले तरी ते प्रत्येक वेळी होणे आवश्यक नाही, म्हणून डॉक्टरांशी (Doctors) संपर्क साधला पाहिजे. याशिवाय, जेवण करताना त्रास होणे, घसा खवखवणे आणि आवाजात बदल होणे तसेच कानात दुखणे आणि रक्तस्त्राव होणे ही लक्षणे असू शकतात. तसेच, हिरड्या, गाल आणि जीभेवर सूज येणे ही सुद्धा तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे ठरु शकतात.
यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला डॉक्टरांना भेटावे लागेल. त्यांच्याकडून प्राथमिक तपासणी करुन घ्यावी लागेल. त्यानंतर बायोप्सी, इमेज टेस्टिंग आणि एंडोस्कोपी केली जाते.
तोंडाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. सर्वप्रथम, तुम्ही तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. काहीही खाल्ल्यानंतर पाणी प्यावे किंवा तोंड स्वच्छ धुवावे. दिवसातून दोनदा ब्रश करावे. अन्न दात किंवा हिरड्यांमध्ये अडकू देऊ नका. तसेच, तंबाखू, दारु, सिगारेटचे सेवन करु नका. याशिवाय, आम्लयुक्त पेये सेवन करु नका.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.