Pramod Yadav
जगभरात आज (31 मे) हा जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जात आहे.
अलिकडे महिला असो वा पुरुष यांच्या धूम्रपानाचे प्रमाण वाढलंय, पण तुम्हाला धूम्रपानाचा शरीरावर होणारे पाच घातक परिणाम माहितीयेत का?
अति धूम्रपानामुळे ह्रदयविकारच्या झटक्याचा धोका अधिक वाढतो याशिवाय रक्तवाहिन्या आक्रसण्याचा धोका असतो.
धूम्रपानामुळे तोंडाचा कर्करोग, श्वासाची दुर्गंधी, दात पडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
धूम्रपानामुळे चिंता, नैराश्य तसेच स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो.
पचनसंस्थेशी संबिधत विकार वाढण्याचा धोका देखील धूम्रपानामुळे वाढतो. तसेच, त्वचा आणि लैंगिक आजार उद्भवू शकतात.
धूम्रपानामुळे नजर कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.