PM Kisan 21st Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंतप्रधान मोदींनी केला जारी

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 19 नोव्हेंबर 2025 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेचा 21वा हप्ता जारी केला. पंतप्रधान मोदी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात, पीएम-किसान योजनेचा थकित असलेला 21वा हप्ता थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला. यामुळे देशभरातील सुमारे 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली.

18000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम वितरित

21व्या हप्त्याच्या स्वरुपात सरकारने एकूण 18000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम एकाच वेळी जारी केली. या माध्यमातून 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळाली. आतापर्यंत (21वा हप्ता धरुन) या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना (Farmer) एकूण 3 लाख 90 हजार कोटी रुपयांहून अधिकची रक्कम हस्तांतरित केली गेली. आपण जर पीएम-किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर आपण आपल्या बँक खात्याची तपासणी करुन जमा झालेला 21वा हप्ता पाहू शकता.

PM Modi
PM Kisan 20th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; असा तपासा बॅलन्स

काय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक प्रमुख केंद्रीय योजना आहे, जी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा आधारस्तंभ बनली आहे. ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरु करण्यात आली. देशातील पात्र शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 6000 इतकी रक्कम थेट त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. ही रक्कम 2000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या 21व्या हप्त्यासह, आतापर्यंत देशातील 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळाली. ही रक्कम शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते आणि इतर शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी मदतगार ठरली.

PM Modi
PM Kisan 20th Installment: करोडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लवकरच खात्यात जमा होणार पीएम किसानचा 20वा हप्ता?

योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

पीएम-किसान (PM Kisan) योजनेचा लाभ हा फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळतो, जे काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता करतात. शेतकऱ्यांची जमीन संबंधित माहिती पीएम-किसान पोर्टलवर नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे. लाभार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे. केंद्र सरकार वेळेवेळी गाव पातळीवर विशेष मोहीम चालवून अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करत आहे, ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन आहे, पण ते आतापर्यंत या योजनेच्या कक्षेत आलेले नाहीत. आपण जर या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल, तर आपण देखील या योजनेत आपले नाव नोंदवू शकता आणि या महत्त्वपूर्ण सरकारी मदतीचा लाभ घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com