Pooja Naik: "ढवळीकर कुटुंबाविरुद्ध जे कारस्थान करतायत, त्यांना...", समर्थकांचे कोटादेवचार देवस्थानात 'गाऱ्हाणे'

Pooja Naik job scam: सुदिन ढवळीकर यांच्या समर्थकांनी पुन्हा एकदाफोंडा येथील श्री कोटा देवचार देवस्थानात पारंपरिक 'गाऱ्हाणे' घातले
Sudin Dhavlikar allegations
Sudin Dhavlikar allegationsDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कॅश-फॉर-जॉब घोटाळ्यामुळे गोव्यातील राजकीय वातावरण तापले असताना, या प्रकरणाला आता धार्मिक आणि भावनिक किनार द्यायला सुरुवात झाली आहे. वीजमंत्री रामकृष्ण 'सुदिन' ढवळीकर यांच्यावर निष्ठा दाखवत त्यांच्या काही समर्थकांनी पुन्हा एकदाफोंडा येथील श्री कोटा देवचार देवस्थानात पारंपरिक 'गाऱ्हाणे' (प्रार्थना) घातले.

'कटकारस्थान' करणाऱ्यांना शिक्षा मिळावी म्हणून प्रार्थना

नोकरी घोटाळ्यातील आरोपी पूजा नाईकने ढवळीकर यांच्यावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या समर्थकांनी देवाचा धावा केला. देवस्थानाच्या प्रमुखाने देवचार महाराजांना आवाहन करून ढवळीकर कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने "ढवळीकर कुटुंबाविरुद्ध जे कोणी कटकारस्थान करत आहेत, त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी," अशी मागणी देवाकडे केली.

पुराव्यांअभावी पूजा नाईकची 'नार्को टेस्ट' होणार?

एकीकडे ढवळीकर समर्थक धार्मिक मार्गाने उत्तर देत असताना, दुसरीकडे भाजपचे उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. खासदार नाईक म्हणाले की, कॅश-फॉर-जॉब घोटाळ्यातील आरोपी पूजा नाईक हिने केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी जर ती पुरेसे पुरावे सादर करू शकली नाही, तर तिची नार्को टेस्ट करण्याची गरज भासू शकते.

Sudin Dhavlikar allegations
Pooja Naik: पूजा नाईकचा 'मोबाईल' तपासासाठी ‘फॉरेन्‍सिक’ कडे! पुराव्‍यांबाबत उत्‍कंठा वाढली; 'नार्को'विषयी मुख्यमंत्र्यांनी टाळले उत्तर

पूजा नाईकने यापूर्वी सुदिन ढवळीकर आणि दोन अन्य अधिकाऱ्यांनी नोकऱ्या देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. चौकशीच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, पुरावे न मिळाल्यास आरोपीची नार्को टेस्ट घेण्याची शक्यता श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com