Oil To Lower High Cholesterol Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Oil To Lower High Cholesterol Level: 'हे' तेल करेल तुमचे कोलेस्ट्रॉल दूर

Oil To Lower High Cholesterol: हे तेल खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.

दैनिक गोमन्तक

Oil To Lower High Cholesterol: भारतातील खाद्यसंस्कृती समृद्ध खाद्यसंस्कृती म्हणून ओळखली जाते. मसालेदार पदार्थांसाठी भारताची ओळख संपूर्ण जगात आहे. यामध्ये तेलकट पदार्थांचा समावेशही होतो. याचा परिणाम म्हणून भारतातील बर्‍याच लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते.

आपल्या घरांमध्ये आणि बाजारात वापरल्या जाणार्‍या बहुतेक स्वयंपाकाच्या तेलामुळे रक्तामध्ये खराब कोलेस्ट्रॉल जमा होते ज्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे टाळण्यासाठी, योग्य तेल निवडणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात कोणते तेल आरोग्यासाठी चांगले आहे.

जर तुम्ही तेलाने समृद्ध असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन केले तर ते खराब कोलेस्ट्रॉल वाढवते. जेव्हा जास्त चरबी जमा होते, तेव्हा ती रक्तातील इतर पदार्थांमध्ये मिसळून रक्तवाहिन्यांना चिकटून प्लेक्स तयार करतात.

जेव्हा आपल्या धमन्यांमध्ये वाईट कोलेस्टेरॉल जमा होते, तेव्हा नसा ब्लॉक होऊ लागतात आणि रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यात समस्या निर्माण होतात. जेव्हा रक्ताभिसरणावर ताण येतो तेव्हा उच्च रक्तदाबाची तक्रार असते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे तेल ठरेल उपयुक्त

प्रसिद्ध न्युशिनिस्ट निखिल वत्स म्हणतात की, ज्यांना कोलेस्टेरॉलची तक्रार आहे त्यांच्यासाठी फ्लेक्ससीड तेल चांगले आहे. हे कोशिंबीर सोबतही खाता येते, हलके गरम करूनही खाता येते.

फॅटी अॅसिडचे समृद्ध स्त्रोत असलेले जवस तेल शरीरासाठी उपयुक्त मानले जाते. त्यात ओलेइक अॅसिड, लिनोलेइक अॅसिड आणि अल्फा-लिनोलेनिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. हे तेल खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.

म्हणूनच जवसाच्या बियापासून तयार केलेले तेल इतर तेलापेक्षा जास्त चांगले मानले जाते. याबरोबरच, आपल्या आरोग्याच्या समस्या समजून घेऊन तेलाचा वापर केला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: पुढच्या पिढीसाठी गोवा जिवंत ठेवणे गरजेचे; सुरेश प्रभूंचे प्रतिपादन

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

SCROLL FOR NEXT