Rooftop Solar: राज्यातील 798 ग्राहकांना शून्‍य रुपये वीज बिल; 1,304 घरांच्‍या छतांवर 'रुफ टॉप सोलर'

Goa Rooftop Solar: राज्‍यात आतापर्यंत १,३०४ रुफ टॉप सोलर बसवण्‍यात आले असून, त्‍याचा फायदा १,५९६ कुटुंबांना होत आहे.
Rooftop Solar
Rooftop SolarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यात आतापर्यंत १,३०४ रुफ टॉप सोलर बसवण्‍यात आले असून, त्‍याचा फायदा १,५९६ कुटुंबांना होत आहे. या प्रणालीमुळे ७९८ ग्राहकांना शून्‍य रुपये वीज बिल येत असल्‍याचे केंद्रीय अक्षय उर्जा राज्‍यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातील आकडेवारीतून समोर आले आहे.

केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षापर्यंत गोव्‍यासह सर्वच राज्‍यांतील एक कोटी घरांच्‍या छतावर रुफ टॉप सोलर प्रणाली बसवण्‍याचे ध्‍येय केंद्र सरकारने बाळगले आहे.

Rooftop Solar
Goa Politics: मनोज परब यांच्‍यामुळेच युती झाली नाही! काँग्रेस–फॉरवर्ड युतीला जनता स्‍वीकारणार - माणिकराव ठाकरे

त्‍यासाठी ७५,०२१ कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. ९ डिसेंबर २०२५ पर्यंत देशभरात एकूण १९,४५,७५८ घरांवर रुफ टॉप सोलर प्रणाली बसवण्यात आली असून, त्‍याचा २४,३५,१९६ कुटुंबांना फायदा झाला आहे, असे मंत्री नाईक यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

Rooftop Solar
Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

रुफ टॉप सोलर प्रणाली बसवण्‍यासाठी केंद्रीय अर्थसाहाय्यासह ५.७५ टक्‍के व्याजदराने तारण-मुक्त कर्जही उपलब्ध करण्‍यात आले आहे, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com