PF Withdrawal: EPFO चा ऐतिहासिक निर्णय: आता PF चे पैसे थेट ATM आणि UPI द्वारे काढता येणार!

EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) करोडो सदस्यांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.
PF Withdrawal
PF WithdrawalDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) करोडो सदस्यांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. नोकरी करणाऱ्या वर्गाला स्वतःच्या हक्काचे पैसे काढण्यासाठी आता क्लिष्ट प्रक्रिया किंवा कार्यालयांच्या चकरा मारण्याची गरज उरणार नाही. मार्च २०२६ पर्यंत पीएफचे पैसे थेट ATM आणि UPI द्वारे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी केली आहे.

सुलभ व्यवहार

सध्या पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम करावा लागतो, ज्याला मंजूर होऊन खात्यात जमा होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, नवीन प्रस्तावित व्यवस्थेनुसार, कर्मचारी आपल्या एकूण जमा पुंजीपैकी ७५ टक्के हिस्सा थेट डिजिटल माध्यमातून काढू शकतील. "पीएफ ही कर्मचाऱ्यांची स्वतःची कमाई आहे आणि ती मिळवण्यात कोणतीही अडचण येऊ नये," असे स्पष्ट मत मांडविया यांनी व्यक्त केले आहे. ही सुविधा लागू झाल्यानंतर ईपीएफओच्या कार्यपद्धतीत मोठा बदल होईल आणि 'डिजिटल-फर्स्ट' दृष्टिकोनाला बळ मिळेल.

PF Withdrawal
Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

कागदपत्रांचा त्रास संपणार

अनेकदा तातडीच्या कामासाठी पैशांची गरज असताना पीएफ काढण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरते. नवीन प्रणालीमुळे कागदी घोडे नाचवण्याची गरज संपणार असून, नोंदणीकृत बँक खात्याद्वारे त्वरित व्यवहार पूर्ण होतील. मार्च २०२६ ही अंतिम मुदत असली तरी, सरकार ही सुविधा त्यापूर्वीच कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तातडीच्या वैद्यकीय गरजा किंवा इतर कौटुंबिक कामांसाठी कर्मचाऱ्यांना कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.

PF Withdrawal
Goa Politics: मनोज परब यांच्‍यामुळेच युती झाली नाही! काँग्रेस–फॉरवर्ड युतीला जनता स्‍वीकारणार - माणिकराव ठाकरे

मंत्रालयाने स्पष्ट केल्यानुसार, सभासदांना त्यांच्या ईपीएफ कॉर्पसमधील ७५% रक्कम काढण्याची मुभा असेल. ही प्रक्रिया यूपीआय (UPI) शी जोडली गेल्यामुळे स्मार्टफोनवरून एका क्लिकवर पैसे ट्रान्सफर करणे शक्य होईल. तंत्रज्ञानाचा हा वापर पीएफ ग्राहकांसाठी गेम-चेंजर ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com