National Consumer Day 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

National Consumer Day: कोणत्याही हॉटेलमध्ये पिऊ शकता मोफत पाणी जाणून घ्या अशाच काही रंजक गोष्टी

आज आम्ही तुम्हाला ग्राहक दिनानिमित्त माहिती नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

Puja Bonkile

भारतात 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन (National Consumer Day) साजरा केला जातो. या दिवशी 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा राष्ट्रपतींनी मंजूर केला होता. जागतिक ग्राहक हक्क दिन देखील दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला ग्राहक दिनानिमित्त माहिती नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

  • तुम्ही कोणत्याही हॉटेल मध्ये मोफत पाणी पिऊ शकता किंवा स्वछतागृहाचा वापर करू शकता. इंडियन सराईज ऍक्टनुसार तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन पाणी पिऊ शकता आणि त्यांचे स्वछतागृह वापरू शकता ते हि अगदी मोफत, पण तुम्ही त्या हॉटेलमध्ये काही घेतलं नाही तरी देखील या दोन सेवांचा वापर तुम्ही करू शकता.

  • जागो ग्राहक जागो ! हि जाहिरात घराघरांत कशी पोहचली ? जागो ग्राहक जागो हि जाहिरात घराघरांत पोहचली होती. ही जाहिरात दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवर यावी यासाठी ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सरकारकडे शिफारस केली होती. “जाहिरातीसाठी असणारी आर्थिक तरतूद वाढवण्यात यावी आणि एक मोहीम सुरु करण्यात यावी. अशी शिफारस करण्यात आली होती. ती केंद्र सरकारनं मंजूर केली, एमआरपी वर देखील किंमत कमी करता येऊ शकते हा संदेश घराघरांत याच मोहिमेमुळे पोहचला होता.

  • सुट्टे पैसे (Money) नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला गोळ्या चॉकलेट देऊ शकत नाही, एक किंवा दोन रुपये सुट्टे नाहीत म्हणून बऱ्याचदा दुकानदार एक रुपयाच्या गोळ्या किंवा चॉकलेट देतात. चलनाला दुसरी पर्यायी वस्तू देण्याचा अधिकार दुकानदारांना नाही.

  • दिलेलं वचन न पाळल्यास कंपनीवर कारवाई होऊ शकते. जाहिरातीमध्ये वचन न पाळल्यास कंपनीवर दावा ठोकू शकतातच, पण त्याचबरोबर त्या उप्तादनाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवरही दावा करू शकता.

  • शैक्षणिक संस्थांनी गुणवत्तेचे निकष न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. 100% प्लेसमेँटची जाहिरात दिली पण नोकरी (Job) मिळाली नाही तर विद्यार्थ्यांसमोर बिकट प्रश्न निर्माण होतो. अनेक संस्था माहितीपत्रकावर अनेक गोष्टींची आणि अत्युच गुणवत्तेची आश्वासन देतात पण ती पूर्ण करत नाहीत, त्या संस्था न्यायालयीन कारवाईसाठी पात्र ठरू शकतात.

  • रुग्णालयाने केलेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचे नुकसान झाले तर रुग्णालयावर कारवाई होऊ शकते. जर रुग्णालय काही सेवा देण्यासाठी पैसे स्वीकारले असतील तर त्या सेवा देण्यास ते बांधील आहेत. जर त्यांची पूर्तता त्यांनी केली नाही तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

Parra Crime: पार्किंगच्या वादातून धारदार शस्त्राने खुनी हल्ला, एकजण गंभीर जखमी; साखळीत युवकाला अटक

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

SCROLL FOR NEXT